शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पुतळा तुडवून नोंदविला निषेध, शिवसैनिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:01 PM

बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. मालवण तालुका शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्यास शिवसेना स्टाईलने तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्दे पुतळा तुडवून नोंदविला निषेध, शिवसैनिक आक्रमक कर्नाटक सरकारकडून शिवछत्रपतींचा अवमान

मालवण : कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून समस्त महाराष्ट्र वासीयांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.

याप्रकरणी मालवण तालुका शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्यास शिवसेना स्टाईलने तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी कर्नाटक शासनाने काढून टाकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने त्याठिकाणी बसवून संपूर्ण शिवभक्तांची व महाराष्ट्रवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.यासोबत उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगरसेवक नितीन वाळके, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही कर्नाटक शासनाचा निषेध नोंदविला व समस्त शिवसैनिकांची निषेधाची भूमिका कर्नाटक शासनापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोहोचवू असे स्पष्ट करण्यात आले.यावेळी नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, अनंत पाटकर, आतू फर्नांडिस, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर, बंड्या सरमळकर, नरेश हुले, दीपा शिंदे, निलम शिंदे, किरण वाळके, राजू परब, प्रवीण रेवंडकर, रवी तळाशिलकर, विद्या फर्नांडिस, भूषण कासवकर, विशाल सरमळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यास उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज