शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वेंगुर्लेत कोरेगाव-भीमा घटनेविरोधात निषेध रॅली                        

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 18:52 IST

कोरेगांव भिमा येथील जातीय दंगली उसळली यांचा निषेध नोंदवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना व वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्‍यावतीने आज वेंगुर्ले शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.

 वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरेगांव भिमा येथील जातीय दंगली उसळली यांचा निषेध नोंदवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना व वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्‍यावतीने आज वेंगुर्ले शहरात निषेध मोर्चा काढत मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्‍काळ अटक कराच्‍या घोषणा देत जातीय दंगली उसळणा-यांवर काडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुख्‍यंमत्री महाराष्‍ट्र शासन यांना देण्‍यासाठी वेंगुर्ले तहसिलदार यांना सादर केले. कोरेगांव भीमा येथे १ जानेवारी रोजी मनुवादी विचारसरणीच्‍या लोकांनी जातीय दंगल घडवून दलित समाजातील बांधवाना मारहाण केली. मराठा व दलित यांच्‍यामध्‍ये वाद घडवून धार्मीक व जातीय तेड निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रवृत्‍तीचा निषेध करण्‍यासाठी आज वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्‍यावतीने आनंदवाडी ते वेंगुर्ले तहसिलदार कार्यालया पर्यंत उत्‍स्‍फुर्त मोर्चा काढत तहसिलदार यांना निवेदन सादर केले. मोर्चा तहसिलदार कार्यालयाकडे आल्‍यावर त्‍याचे सभेत रुपांत करण्‍यात आले. जातीय दंगली घडविणा-या मनुवादी वृत्‍तीचा धिक्‍कार करत दलीत मराठा समाजात तेड निर्माण करणा-या शक्‍तींपासून बहुजन समाजाने जागृत राहून एकत्रीत येऊन काम केले पाहीजे. ही दंगल घडविण्यास मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच जबाबदार असून त्‍यांच्‍यावर कडक करावी करण्‍यात यावी. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्‍य मंत्री दिपक केसरकर यांनी दंगली घडविणारे मनोहर भिडे यांना दिलेले सर्टिफिकेटस दलीत विरोधी असल्‍याच्‍या प्रतिक्रिया उपस्थीत वक्‍त्‍यांनी व्‍यक्‍त केल्‍या. यावेळी सामाजीक कार्यकर्ते महेश परुळेकर, वाय.जी.कदम, सावंतवाडीचे वासुदेव जाधव, भारतीय बौध्‍द महासंघाचे जिल्‍हा अध्‍यक्ष सत्‍यवान जाधव, वि.रा.आसोलकर, सौ.स्‍नेहल पालकर यांनी मोर्चास मार्गदर्शन केले. वेंगुर्ले तहसिलदार शरद गोसावी यांच्‍याकडे शिष्‍टमंडळाने सादर केलेल्‍या निवेदनात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्‍काळ अटक करा, न्‍यायालयीन चौकशी आयोग ताबडतोब स्‍थापन करुन जलद गतिने सदर दंगलीचा तपास करावा, हया गुन्‍हयाची सुनावणी जलदगती न्‍यायालयात करण्‍यात यावी, विशेष सरकारी वकिलांची नियुक्‍ती करण्‍यात यावी, गोविंद गायकवाड यांच्‍या समाधीचे संवर्धन व जतन करण्‍यात यावे, सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनते समोर आणावा अशा आशयाचे निवेदन देण्‍यात आले यावेळी. या शिष्‍टमंडळात वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समिती अध्‍यक्ष सुभाष जाधव, भिवा जाधव, महेश  परुळेकर, सत्‍यवान जाधव, वासुदेव जाधव ,माजी नगरसेवक एकनाथ जाधव, वामन कांबळे, सुचिता कदम, लवू तुळसकर, सावित्री बाई फुले महिला मंडळ अध्‍यक्षा सौ.सरोजनी जाधव, वृषाली जाधव आदी सह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील शेकडो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावsindhudurgसिंधुदुर्ग