शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर विविध सेवांसाठी आंदोलन; 'बाहेर चकाचक आतून फकाफक’ बॅनरने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:46 IST

कोकण रेल्वे प्रवासी समन्वय, संघर्ष समितीचा पुढाकार 

ओरोस : रेल्वे प्रशासनाचा जलद गाड्यांना थांबवण्यास नकार, ‘कोकण रेल्वे कोणाची? कोकणी माणसाची की परराज्याची?’ आणि ‘कोकणचा विकास होत आहे, तरी रेल्वे स्टेशन भकास आहे’ अशा घोषणाही देत सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबाव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवारी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग या संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्ने, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरे अशा दहा रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकासह विविध स्थानकांवर कायमस्वरूपी थांबा मिळावा, यासाठी मागील तीन वर्षांपासून संघटनेमार्फत मागणी केली जात आहे. यासाठी विविध लोकप्रतिनिधींशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून उपोषण करूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही अद्याप या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.

गणेशोत्सव काळात तत्काळ नवीन गाड्या सुरू करा२७ ऑगस्ट २०२५ पासून कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या सणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही गाडी बुकिंगसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजे २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान, मडुरे ते दादर आणि सावंतवाडी ते दादर असंख्य प्रवाशांसाठी दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या गाड्या कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकासह वैभववाडी व नांदगाव रेल्वे स्थानकांवर तात्काळ आरक्षण खिडकी सुविधा सुरू करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन सुरू करावीजिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर किमान पंधरा लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे करावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील कॅन्टीन तात्काळ सुरू कराव्यात, तसेच प्लॅटफॉर्म सुविधा नसलेल्या सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या या निवेदनामध्ये समाविष्ट आहेत.

रेल्वे स्थानकाबाहेर जनआंदोलनही मागणी मान्यता मिळवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाबाहेर जनआंदोलन करण्यात आले. याला प्रवासी संघटना, रिक्षा चालक-मालक संघटना, राजकीय संघटना आणि पत्रकारांनी खुला पाठिंबा दर्शविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, उपाध्यक्ष परशुराम परब, नागेश ओरोसकर, शुभम परब आणि अनेक नागरिक उपस्थित होते.

बॅनरने वेधले सर्वांचे लक्षजिल्ह्यातील काही रेल्वे स्थानकांचे बाहेरून सुशोभीकरण करण्यात आले असले तरी अंतर्गत सुविधा अजूनही अपुरी आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान ‘काय ती झाडी काय तो प्लॅटफॉर्म, बाहेर चकाचक आतून फकाफक’ असा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.