शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पोटखराबा जमिनी विम्यासाठी संरक्षित करा, नारायण राणेंनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मांडल्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:52 IST

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर हा डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा आहे. अरबी समुद्र ते ...

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर हा डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा आहे. अरबी समुद्र ते सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील अरुंद पट्टीवर तयार झालेला भूभाग आहे. डोंगराळ प्रदेशाचा भाग असल्याने या जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहेत. अशा खडकाळ जमिनीवर या बागायती पिकांची मोठ्या कष्टाने शेतकरी, बागायतदार लागवड करतात.दरम्यान, पीक विमा कंपन्यांनी या वर्षीपासून पोटखराबा जमीन विमा संरक्षणातून वगळण्यास सुरुवात केली आहे. विमा कंपन्यांच्या या कृत्यामुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या पोटखराबा जमिनीचा (खडकाळ आणि कोरडा भाग) विमा क्षेत्रात समावेश करावा. यासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.त्यांची दिल्ली येथे भेट घेत कोकणातील शेतकरी, बागायतदारांच्या समस्या खासदार नारायण राणे यांनी मांडल्या. यावेळी निवेदनही कृषिमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान, आपण कोकणातील शेतकऱ्यांसाठी लवकरच दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खासदार नारायण राणे यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे.त्यात म्हटले आहे की, माझा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी - सिंधुदुर्ग हा पश्चिम घाट परिसराचा एक भाग आहे. पश्चिम घाटात डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा समावेश आहे. या दोन जिल्ह्यांतील मुख्य पिके म्हणजे आंबा, नारळ, सुपारी, काजू आणि इतर फलोत्पादन उत्पादने, डोंगराळ प्रदेशाचा भाग असल्याने या जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहे. या खडकाळ जमिनीवर बागायती पिकांची अत्यंत कष्ट घेत लागवड केली जाते.

सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचनराज्य सरकारच्या महसूल विभागात या खडकाळ जमिनींचे वर्गीकरण प्रामुख्याने पोटखराबा म्हणजे खडकाळ आणि शेतीअयोग्य जमीन असे केले जाते. या जमिनींवर पिकणाऱ्या फळांना मोठी मागणी असते. दुर्दैवाने, पीक विमा कंपन्यांनी या वर्षापासून पोटखराबा जमीन विमा संरक्षणातून वगळण्यास सुरुवात केली आहे. विमा कंपन्यांच्या या कृत्यामुळे वरील दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे अभिवचन कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजनाNarayan Raneनारायण राणे