शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांची पायपीट सुरुच

By admin | Updated: October 5, 2015 00:07 IST

गडनदी प्रकल्प : पाटबंधारे खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष

सुभाष कदम- चिपळूण --सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजीवली, रातांबी, कुटगिरी- येडगेवाडी येथे पाटबंधारे खात्यातर्फे गडनदी प्रकल्प उभारण्यात आला. परंतु, येथील प्रकल्पग्रस्तांना अद्यापही विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना रस्त्याअभावी एस. टी. बस बंद पडल्याने १२ कि. मी.ची पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागण्यांकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त आपला घर संसार, सामानसुमान घेऊन पाटबंधारे कार्यालयात संसार थाटणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे खाते, उपविभागीय अधिकारी, चिपळूण व संगमेश्वर, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना ठिय्या आंदोलनाबाबत नोटीस देण्यात आली आहे. या नोटिसमध्ये आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचण्यात आला आहे. गडनदी प्रकल्प येण्यापूर्वी कुटगिरी येडगेवाडीचा रस्ता हा नदीतून जात होता. धरण क्षेत्रात राजीवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत ९ वाड्यांचा समावेश आहे. धरणक्षेत्रात येणाऱ्या ७ वाड्यांचे पुनर्वसन धरणालगतच करण्यात आले. कुटगिरी - बौद्धवाडीचे पुनर्वसन खेरशेत(चिपळूण) येथे करण्यात आले. शिर्केवाडी व घाडगेवाडी शासकीय पुनर्वसन गावठाणे येथे करण्यात आले. कदमवाडी, निकमवाडी व राजीवली- बौद्धवाडी यांनी स्वेच्छा पुनर्वसन करुन धरणाशेजारीच आपल्या जमिनीत राहण्याचा निर्णय घेतला. पाटबंधारे खात्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे रातांबी आणि राजिवली - काळंबेवाडी यांच्या पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडले आहे. या सर्व वाड्या धरणाच्या उजव्या बाजूला एकाच मार्गावर प्रस्थापित झाल्या तर येडगेवाडीचे पुनर्वसन न करता या वाडीला नागरी सुविधा देण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संतोषकुमार यांनी मान्य केले होते. त्याला अनुसरुन प्रशासनाने संयुक्त पुनर्वसन गावठाणे रिंगरोडने जोडण्यासाठी १५ कि. मी. चा रिंगरोड तयार करण्याचे निश्चित झाले. सन २००५मध्ये या कामाला सुरुवात झाली. परंतु, या कामाला चालढकल सुरु आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु असल्याने प्रकल्पग्रस्त हैराण झाले आहेत.वारंवार केलेल्या मागणीनंतर १० कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. परंतु, हे कामही निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून प्रयत्न केले. प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर ठेकेदाराने ३ कि. मी. पैकी ६३० मीटर बी. बी. एम.चे काम झाले. उर्वरीत काम अपूर्ण असल्याने या मार्गावरील एस. टी. बस बंद झाल्याने आता प्रकल्पग्रस्तांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आंदालनाचा इशारा दिला आहे.कार्यालयातच ठिय्या आंदोलन करणारगड प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलने केली.पावसाळ्याच्या तोंडावर केवळ ३ कि.मी.पैकी ६३० मीटर रस्ता डांबरीकरण करुन केली बोळवण.पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभाराचा रातांबी व राजीवली ग्रामस्थांना फटका.रस्ता नादुरुस्त असल्याने येडगेवाडी एस. टी. सेवा बंद.आता घरसंसार घेऊन पाटबंधारेच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन करुन तेथे संसार मांडण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंतांसह उपविभागीय अधिकारी , पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनाही दिली नोटीस.