गोगटे-जोगळेकरमध्ये प्रकल्प सादरीकरण
By Admin | Updated: December 1, 2014 00:17 IST2014-11-30T21:49:42+5:302014-12-01T00:17:31+5:30
तीन गटांमध्ये व पदव्युत्तर स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ११६ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले

गोगटे-जोगळेकरमध्ये प्रकल्प सादरीकरण
रत्नागिरी : येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये व पदव्युत्तर स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ११६ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पोस्टर व पॉवर पॉर्इंटच्या माध्यमातून आपले संशोधन परीक्षकांसमोर सादर केले.कला शाखेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पदवीस्तरातून हिमानी कोत्रे, श्रुती साळवी, चेतना घाटे (गो-जो-महाविद्यालय), डिंपल वासवानी, चित्रलेखा खानविलकर (एससीएस महाविद्यालय, लांजा), नगमा वेलिसकर (डीबीजे महाविद्यालय), निहार वैद्य, चिन्मयी कोचरे (नातू महाविद्यालय) यांची, तर पदव्युत्तर गटांतून गौरी सावंत (गो-जो महाविद्यालय), अरविंद निवदेकर (डीबीजे महाविद्यालय) यांची पुढील फेरीकरिता निवड झाली आहे.वाणिज्य शाखेमध्ये पदवीस्तरावर मुस्सरत मुल्ला, अक्षता शेवडे, अक्षय शेरे (गो - जो महाविद्यालय), अक्षयकुमार लिंबानी (डीबीजे महाविद्यालय), खलील पौत्रिक (ज्ञानदीप महाविद्यालय, खेड) विद्यार्थी यशस्वी झाले.
विज्ञान शाखेतील स्पर्धेमध्ये पदवीस्तरावर कांचन ठाकूर, अनिरूध्द भिडे, श्रुती वाघधरे, दिप्तेश शितोळे, तेहसीन नाकाडे (गो - जो महाविद्यालय), रूखसार खतीब, माधुरी कारंडे (ए. एस. पी. महाविद्यालय, देवरूख), स्वाती गवस (डीबीजे महाविद्यालय), स्नेहल रसाळ, विराज पालवी, ऋषिकेश कोलते, सिध्दी लाडे (एसीएस महाविद्यालय, लांजा), योगेश देशमुख (आयसीएस महाविद्यालय, खेड), प्रतीक नाटेकर (ए. एन. महाविद्यालय, राजापूर), अन्वी वैद्य (दापोली महाविद्यालय) हे विद्यार्थी यशस्वी ठरले. पदव्युत्तर गटात प्राजक्ता शेट्ये (दापोली कॉलेज), निनाद वाणी (डीबीजे महाविद्यालय) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेसाठी कला शाखेकरिता परीक्षक म्हणून डॉ. मृगेंद्र रॉय, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. विजय तापस, डॉ. वैभवी पळसुले, वाणिज्य शाखेकरिता डॉ. सुनीती नागपूरकर, डॉ. वीणा प्रसाद, प्रा. मधुकर मगदूम, डॉ. सुवर्णा देवूस्कर, प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे, प्रा. हेलन सेल्वाज, तर विज्ञान शाखेसाठी प्रा. प्रल्हाद सोमण, प्रा. डी. डी. जोशी, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. मंगेश साठे यांनी काम पाहिले. स्पर्धेची पुढील फेरी विद्यापीठ स्तरावर ३ डिसेंबर रोजी सी. के. टी. महाविद्यालय, पनवेल येथे होणार आहे. (प्रतिनिधी)