कणकवली बस स्थानकानजीक टपरीवरमटका अड्ड्यावर छापा; एकास अटक, सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:19 IST2017-11-30T17:16:10+5:302017-11-30T17:19:17+5:30
कणकवली येथील बस स्थानकानजीक टपरीवर मटका घेताना एकाला कणकवली पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २२८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला अटक करून त्याची सुटका करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण भोसले यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

कणकवली बस स्थानकानजीक टपरीवरमटका अड्ड्यावर छापा; एकास अटक, सुटका
कणकवली : येथील बस स्थानकानजीक टपरीवर मटका घेताना एकाला कणकवली पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २२८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला अटक करून त्याची सुटका करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण भोसले यांनी कणकवली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. विनापरवाना लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सावंत (३२, असरोंडी-वाकाडवाडी, ता. कणकवली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, हवालदार उत्तम पवार व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण भोसले यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, हवालदार उत्तम पवार व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण भोसले हे दुपारची गस्त घालत असताना त्यांना संतोष सावंत हा लोकांकडून मटका खेळण्यासाठी पैसे घेत असल्याचे दिसले.
पैसे देण्यासाठी आलेली व्यक्ती पोलिसांना पाहताच पळून गेली. संतोष सावंत याची चौकशी केली असता त्याच्याकडे १७८५ रुपये रोख, मोबाईल, पेन व कागद सापडला. मटका खेळत असल्याचे दिसताच पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.