दोडामार्ग येथील हॉटेलांवर छापा

By Admin | Updated: November 23, 2014 00:39 IST2014-11-23T00:35:01+5:302014-11-23T00:39:20+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आठही तालुक्यात कारवाई

Print to Hotel at Dodamarga | दोडामार्ग येथील हॉटेलांवर छापा

दोडामार्ग येथील हॉटेलांवर छापा

कसई दोडामार्ग : जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यात सर्व तहसीलदारांनी धडक मोहीम राबवून घरगुती वापराचे सिलिंडर हॉटेलमध्ये अनधिकृतपणे वापरले जातात का? याबाबतची पाहणी केली. यामध्ये घरगुती वापराचे सिलिंडर अवैधरित्या हॉटेलमध्ये वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दोडामार्ग तहसीलदारांनी भेडशी भागात दोन, आंबडगाव एक, दोडामार्ग शहरात तीन असे एकूण सहा सिलिंडर ताब्यात घेतले.
दोडामार्ग तालुक्यातील महसूलने काढलेल्या धडक मोहिमेची चाहुल लागल्याने सतर्क झालेल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांनी सिलिंडर काढून बाजूला ठेवले होते. ही मोहीम अशीच पुढे सुरू ठेवणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. या कारवाईत नायब तहसीलदार ए. जी. मोरे, प्रकाश पास्ते, राजन गवस आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग
होता. (वार्ताहर)
४भविष्यात अजून बरेच सिलिंडर कारवाईत मिळणार आहेत. अवैधरित्या हॉटेलमध्ये सिलिंडर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांनी दिली.

Web Title: Print to Hotel at Dodamarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.