शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीत

By admin | Updated: September 30, 2014 00:23 IST

प्रवीण भोसले : काँग्रेसने तिकीट दिले नाही म्हणून नाराजच

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आंबोलीचा घाट दाखवू म्हणणारे, माजी आमदार दीपक केसरकर यांनी अनेकवेळा पवारांचाच आधार घेऊन राजकारण केले आहे. तसेच तिकिट न दिल्याने काँग्रेसवर नाराज असलो तरी धर्मांधशक्तींना रोखण्यासाठीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.प्रवीण भोसले यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, युवक उपाध्यक्ष अबिद नाईक, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, उमेदवार सुरेश दळवी, शिवाजी गवस, युवती अध्यक्ष नेहा परब, जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे, नारायण सावंत आदी उपस्थित होते.यावेळी प्रवीण भोसले म्हणाले, मी काँग्रेसकडे सावंतवाडी मतदार संघात तिकिट मागितले होेते पण माझा विचार करण्यात आला नाही, याचे मला दु:ख झाले असले तरीही कोणावरही रोष नाही. माजी आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षात राहून लोकांची दिशाभूल केली आहे. दहशतवादाचा बागलबुवा करत लोकांची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकीत हे शक्य नाही. त्यांना जनता योग्यवेळी धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)‘शरद पवार अनेकवेळा आंबोली घाट उतरले’माजी आमदार दीपक केसरकर म्हणतात की, कोकणी जनता स्वाभिमानी आहे. शरद पवारांना आंबोलीचा घाट दाखवू. पण त्यांना हे पण माहिती असले पाहिजे की, पवार हे अनेक वेळा आंबोली घाट उतरले आणि चढले आहेत. देशाचे राजकारण चालविणाऱ्या पवारांसाठी केसरकर हे शुल्लक असल्याचा टोला दळवी यांनी हाणला.