अहवाल ‘अपेडा’कडे सादर

By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-28T23:44:15+5:302015-10-29T00:08:11+5:30

उष्णजल प्रक्रिया : निकष तीन टप्प्यात

Present to the report 'Aapda' | अहवाल ‘अपेडा’कडे सादर

अहवाल ‘अपेडा’कडे सादर

रत्नागिरी : फळमाशीवर उष्णजल प्रक्रियेचा उपाय सुचवण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पणन विभागामध्ये कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू होते. उष्णजल प्रकियेबाबत संशोधन करण्यात आले असून, तीन टप्यातील निकष काढण्यात आले आहेत. या निकषांचा अहवाल ‘अपेडा’कडे पाठवण्यात आला आहे.
फळमाशीचे कारण देत युरोपिय देशांनी आंबा निर्यातीवर २०१४ साली बंदी घातली होती. गतवर्षी निर्यातीवरील बंदी उठवताना उष्णजल प्रक्रियेचा प्रस्ताव सुचवण्यात आला होता. भारतातील नगदी पीक म्हणून आंबा ओळखला जात असल्याने राष्ट्रीय फळ म्हणून त्याला प्रसिध्दी मिळाली आहे. फळांची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार अशा गुणवैशिष्ट्यांमुळे कोकणातील आंब्याची ‘हापूस’ जात जगामध्ये सर्वोत्कृष्ठ ठरली आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर हा आंबा लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तविले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळाकडून संशोधन सुरू होते. हे संशोधन आता पूर्ण झाले असून, अहवाल जिल्हा पणन विभाग व आंबा काजू बोर्डातर्फे ‘अपेडा’कडे पाठवण्यात आला आहे.
‘अपेडा’कडून लवकरच त्याबाबत आणखी संशोधन करून शेतकऱ्यांसाठी उपयक्त निकष जाहीर करण्यात येणार आहेत. जिल्ह््यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.
उत्पादित आंबा मोठ्या प्रमाणावर आखाती देशात विक्रीसाठी पाठवण्यात येतो. युरोपिय देशातही हा आंबा विक्रीसाठी पाठवण्यात येत होता. मात्र, फळमाशीचे कारण देत या आंब्याच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली होती. मात्र, गतवर्षी त्यावर उष्णजल प्रक्रिया सुचवण्यात आली. परंतु, संशोधन पूर्ण न झाल्यामुळे तात्पुरत्या ‘व्हेपर ट्रीटमेंट’ला मान्यता देण्यात आली होती.
आता हापूसच्या बाबतीत उष्णजल प्रक्रियेचे संशोधन पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या निकषांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता यावर्षी हापूसच्या निर्यातीसाठी युरोपिय बाजारपेठ खुली होणार आहे. (प्रतिनिधी)

कृषी विद्यापीठ : पणन विभागात संशोधन
उष्णजल प्रक्रिया हापूसवर केल्यास त्याचा परिणाम हापूसवर किंवा त्याच्या चवीवर, योग्यतेवर काही परिणाम होतो का? याची कारणमिमांसा करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. कृषी विद्यापीठामार्फत पणन विभागात हे संशोधन करण्यात आले. त्याचा अहवाल आता सादर झाला आहे.

Web Title: Present to the report 'Aapda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.