कणकवली येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रवीण सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 18:17 IST2017-12-02T18:13:30+5:302017-12-02T18:17:10+5:30
कणकवली कनकनगर येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रवीण सावंत यांनी गुरुवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. विजयभवन येथे झालेल्या पक्षप्रवेशात आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. शहरातील अनेक पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. येत्या काळात त्यांचाही शिवसेनेत योग्य सन्मान करणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रवीण सावंत यांचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी राजू शेट्ये, सुशांत नाईक, शैलेश भोगले, शेखर राणे, राजू राठोड, सचिन सावंत, सुजित जाधव, स्नेहा तेंडुलकर, नंदिनी धुमाळे आदी उपस्थित होते. (छाया -अनिकेत उचले )
कणकवली : कनकनगर येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रवीण सावंत यांनी गुरुवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. विजयभवन येथे झालेल्या पक्षप्रवेशात आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. शहरातील अनेक पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. येत्या काळात त्यांचाही शिवसेनेत योग्य सन्मान करणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, विधानसभाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, सचिन सावंत, शहरप्रमुख शेखर राणे, स्नेहा तेंडुलकर, नगरसेविका नंदिनी धुमाळे, संजीवनी पवार, वैभवी पाटकर, प्रतीक्षा साटम, प्रमोद मसुरकर, सुजित जाधव, सुनील पारकर, राजन म्हाडगुत, अजित काणेकर, बाळा कुडतरकर, प्रशांत वनस्कर, संतोष सावंत, समीर सावंत, योगेश मुंज, बाळू पारकर, तेजस राणे, महेश देसाई, रुपेश आमडोस्कर, भूषण परुळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
आपण पक्षासाठी प्रामाणिक काम करूनदेखील भाजपने आपल्याला विश्वासात न घेतल्याने शिवसेनेच्या माध्यमातून येत्या काळात पक्ष वाढीसाठी योगदान देणार असल्याचे प्रवीण सावंत यांनी सांगितले.