शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

आरोग्य हक्क मिशन उपक्रमाला विधायक सहकार्य करणार : प्रजित नायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 6:40 PM

zp Health Sindhudurg- जागरुक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था स्वत:हून प्रशासनाच्या मदतीला येत असतील तर सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने होऊ शकेल. सिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशनच्या माध्यमातून होत असलेले आरोग्यविषयक काम प्रशंसनीय असून या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाचे विधायक सहकार्य राहील. मिशनसोबत एप्रिलमध्ये बैठक घेऊन सविस्तर चर्चा करू, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.

ठळक मुद्देआरोग्य हक्क मिशन उपक्रमाला विधायक सहकार्य करणार : प्रजित नायरस्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना दिले आश्वासन

ओरोस : जागरुक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था स्वत:हून प्रशासनाच्या मदतीला येत असतील तर सर्वसमावेशक विकास अधिक वेगाने होऊ शकेल. सिंधुदुर्गआरोग्य हक्क मिशनच्या माध्यमातून होत असलेले आरोग्यविषयक काम प्रशंसनीय असून या उपक्रमाला जिल्हा परिषद प्रशासनाचे विधायक सहकार्य राहील. मिशनसोबत एप्रिलमध्ये बैठक घेऊन सविस्तर चर्चा करू, असे प्रतिपादन सिंधुदुर्गजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व जागरुक नागरिकांनी स्थापन केलेल्या ह्यसिंधुदुर्ग आरोग्य हक्क मिशनह्णच्या शिष्टमंडळाने नायर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिशनची माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते.या शिष्टमंडळात आधार फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, घुंगुरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री, निखिल सिद्धये उपस्थित होते. शिष्टमंडळाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन नायर यांचे स्वागत करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री यांनी १०८ रुग्णवाहिकेचा मुद्दा उपस्थित केला. १०८ ही रुग्णवाहिका सेवा बीव्हीजी कंपनीकडून चालवली जाते. तथापि, या रुग्णवाहिकेवर सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी व वाहनचालक यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. यासाठी संबंधित कंपनीसोबत बैठक आयोजित करुन हे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.एप्रिल महिन्यात व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊसमाजातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था एका महत्त्वाच्या प्रश्नांवर एकत्र येऊन प्रशासनासोबत समन्वयाने काम करु इच्छितात, हा मिशनचा उपक्रमच विधायक आहे, असे सांगून नायर यांनी या व्यासपीठाच्या संकल्पनेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, मी नुकताच या जिल्हयात रुजू झालो आहे. पालघरसारख्या भागात काम केल्याने मला ग्रामीण भागातील समस्यांची कल्पना आहे. विभागवार आढावा घेण्याचे कामही मी सुरु करीत आहे. 'मिशन'सोबत एप्रिल महिन्यात व्यापक बैठक घेऊन त्यावेळी सविस्तर चर्चा करुन जे प्रश्न माझ्या अखत्यारीत आहेत, ते सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग