शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

प्राजक्ता पवार मृत्यू प्रकरण : विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 3:40 PM

कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हळदिचे नेरूर या शाळेतील विद्यार्थिनी प्राजक्ता पवार हिच्या मृत्यूस कारणीभूत असणा-यांची तसेच या शाळेतील एका विद्यार्थिनीला फोन करून धमकी देणा-या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रशालेचे अध्यक्ष के. एस. सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग - कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हळदिचे नेरूर या शाळेतील विद्यार्थिनी प्राजक्ता पवार हिच्या मृत्यूस कारणीभूत असणा-यांची तसेच या शाळेतील एका विद्यार्थिनीला फोन करून धमकी देणा-या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रशालेचे अध्यक्ष के. एस. सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे केली आहे. तसेच योग्य तपास करून विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा. असे न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आला आहे.

प्राजक्ता पवार विष प्राशन करून आत्महत्या प्रकरणाची तसेच याच शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीला याच शाळेतील विद्यार्थी आणि कॉलेज बाहेरील काही मुलांकडून फोनवरून धमकी दिली जात असल्याप्रकरणी नेरूर कर्याद नारूर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हळदिचे नेरूर या संस्थेचे अध्यक्ष के. एस. सावंत यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्याध्यापक जी. एन. कांबळे, सचिव समीर नाईक, सुनिल सावंत, उदय सावंत, सिताराम सावंत, रामचंद्र काळे आदी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सावंत म्हणाले, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हळदिचे नेरूर या प्रशालेत शिकणा-या प्राजक्ता पवार या विद्यार्थिनीने १८ नोव्हेंबर रोजी प्रार्थनेच्या वेळी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या  करण्याच्या प्रयत्न केला. ही बाब तेथील शिक्षकांच्या त्या विद्यार्थिनीला उलट्या होऊ लागल्यावर निदर्शनास आले. प्राजक्ता हिला लगेचच माणगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यावेळी तेथील डॉक्टरांनी प्राजक्ताला मृत घोषित केले. प्राजक्ता हिने आत्महत्या करते वेळी तिच्या मृत्युस कारणीभूत व्यक्ती व बाबी एका चिठ्ठीमध्ये नमूद केले होते. यावरून या मुलीला काही मुलांकडून त्रास दिला जात असल्याचे निर्दशनास येत आहे. 

त्यामुळे प्राजक्ताला घरी जावून धमकावणाºया व्यक्तींची चौकशी करावी. तिला विषारी द्रव्य कोठून मिळाले तसेच तिला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरणा-या संबंधितांचीही चौकशी करावी. तसेच या प्रकरणात कोणाचाही  समावेश असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत ही चौकशी नि:पक्षपातीपणे न झाल्यास संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, नागरिक यांच्या समवेत आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती संस्थाध्यक्ष  सावंत यांनी दिली.१८ नोव्हेंबर रोजी याच शाळेतील प्राजक्ता या विद्यार्थिनीने प्रार्थनेच्या वेळी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या सर्व बाबी दोन्ही घटनांशी मिळत असल्याने तत्काळ संस्थाचालकांनी बैठक घेत या प्रकरणाकडे  पोलीस अधिक्षकांचे लक्ष वेधण्याचे निश्चित केले होते. शुक्रवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेत विद्यार्थिनीला फोन करून धमकी देणा-यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  संबंधितांवर कारवाई न झाल्यास शाळा, ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाºया विधार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शाळेत पाठविणार नाहीत. त्यांचे शाळेसह शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यार्थिनीला फोन करून धमकी देत भीतीचे वातावरण निर्माण करणा-यांवर कठोर कारवाई करून विद्यार्थिनी व शाळेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अधिक्षकांकडे केल्याची माहिती संस्थाध्यक्ष सावंत यांनी दिली.

फोन करुन धमकी देणा-याची चौकशी करान्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हळदिचे नेरूर या शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीला शाळेतील आणि शाळे बाहेरील विद्यार्थ्यांनी फोन करून धमकी दिल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी  शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. याबाबत आम्ही चौकशी केली असता या तक्रार अर्जावरुन काही आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्या होत्या. त्यामुळे शाळेतील संबधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना १७ नोव्हेंबर रोजी शाळेत चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तो विद्यार्थी आणि त्याचे पालक शाळेत हजर राहिले नाहीत.   

टॅग्स :Suicideआत्महत्याsindhudurgसिंधुदुर्ग