शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अल्पवयीन युवती खून प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे, १६ वस्तू हस्तगत; एकतर्फी प्रेमातून खून केल्याची संशयित आरोपीची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:08 IST

कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणार

कुडाळ : अल्पवयीन युवती खून प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस, मांडशेतवाडी) याने खूनानंतर लपवून ठेवलेली खूनासाठी वापरलेली दोरी, दप्तर, मोबाइल, ओळखपत्र अशा तब्बल १६ वस्तू पोलिसांनी दोन दिवसांच्या शोध मोहीमे दरम्यान हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.संशयित आरोपी कुणाल कुंभारने एकतर्फी प्रेमातून हा निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे. त्याने युवतीचा गळा दोरीने घालून मारल्यावर तिचा मृतदेह वाडोस येथील निर्जन शेतमांगरात लपवून ठेवला होता. कुडाळ पोलिसांनी त्याला अटक करून सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

झुडपात लपवलेली सॅक आणि महत्त्वाचे पुरावे :गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवस आरोपीला वाडोस येथील श्री देव बाटमकर मंदिर (बाटमाचा चाळा) परिसरात घेऊन जाऊन तपास करण्यात आला. पोलिस, पंच आणि आरोपी या सर्वांच्या उपस्थितीत आरोपीने डॉ. शरद पाटील यांच्या शेतमांगराजवळील झुडपाजवळ लपवलेली चिखलाने माखलेली सॅक बाहेर काढली.

या सॅकमध्ये आढळून आलेल्या वस्तूंमध्ये:- नायलॉन दोरी (७ फूट १ इंच लांब), युवतीचे ओळखपत्र, एसटी महामंडळाचा पास, मोबाइल सिमकार्ड, पैसे असलेली हँडपर्स, शालेय वस्तू (वही, पुस्तके, पेन्सिल, रबर), छत्री, हातरुमाल, थम्ब रिंग, लोखंडी कात्री, सॅनिटरी पॅड्स या वस्तू होत्या.कोल्हापूर येथील न्यायवैद्यक पथक लवकरच भेट देणारसुरुवातीला युवती आणि संशयित आरोपी कुणाल यांच्यात मैत्री होती. कुणालने तिला प्रपोज केल्यानंतर दोघांमध्ये काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, पुढे आपल्या करिअरकडे लक्ष देऊ इच्छित असल्यामुळे तिने हे संबंध थांबविले. काही काळानंतर इतर मित्रांसोबत संवाद साधत असल्याचे समजताच कुणाल चिडला आणि त्यातूनच त्याने खून केला, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कुडाळ पोलिसांनी आरोपीची दुचाकी ताब्यात घेतली आहे. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैद्यक विभागाचे पथक लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Minor Girl Murder Case Solved; Accused Confesses to Crime

Web Summary : Sindhudurg police recovered 16 items linked to a minor girl's murder. The accused confessed, stating he killed her due to unrequited love. The investigation continues.