बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:54 IST2025-04-16T15:52:39+5:302025-04-16T15:54:05+5:30

मालवण : कुडाळमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उद्धवसेनेत ...

Plot to defame Sindhudurg by comparing the murder case in Kudal with Beed, Nilesh Rane warns Vaibhav Naik | बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले.. 

बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले.. 

मालवण : कुडाळमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उद्धवसेनेत होता. माजी आमदार वैभव नाईक यांचा कार्यकर्ता होता. असे असताना आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे व बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणाशी तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करण्याचा वैभव नाईकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुडाळ-मालवणचे शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी दिला आहे.

पैशाच्या व्यवहारातून सिद्धेश शिरसाट याने हा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी हा खून झाला तेव्हा सिद्धेश शिरसाट हा उद्धवसेनेत व माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत मिरवत असतानाचे अनेक फोटो आहेत. या खुनानंतर तो वैभव नाईक यांच्या पक्षाच्या आशय खाली होता व त्यांचेच काम करत होता. त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कुठे गायब झाला व त्यावर आरोपींनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कसा घटनाक्रम राबविला, याची अधिकची माहिती वैभव नाईक यांना माहीत असेल.

आपण शिंदेसेनेमध्ये आठ महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता. तो खून दोन वर्षांपूर्वीच झाला होता. त्यामुळे आमच्यावर व आमच्या पक्षावर असे आरोप करताना किंवा त्याबाबतचे राजकारण करताना वैभव नाईक यांनी आपले हसू करून घेऊ नये. त्यांना डोक्याचा अजिबात भाग नसल्यामुळे किंवा बौद्धिक विकास नसल्यामुळे ते हास्यास्पद विधाने व आरोप करीत आहेत.

नाहक बदनामी

खरे तर बीडमधील घटना व हा खून यांचा संबंध लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करणे, हे माजी आमदारांना सोबत नाही. यापुढे सिंधुदुर्गची बदनामी सहन केली जाणार नाही. जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही, याची दक्षता यापुढे त्यांनी घ्यावी. आमचे नेते एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांचे फोटो व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही. वैभव नाईक यांनी आयुष्यभर हेच केले. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधी पदावरून पायउतार व्हावे लागले.

Web Title: Plot to defame Sindhudurg by comparing the murder case in Kudal with Beed, Nilesh Rane warns Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.