शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने धडा शिकवावा, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:45 IST

त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत.

कणकवली : कोकण भूमीत जे उन्मत्त होतात ते या परशुराम भूमीत गाडले जातात. राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांना मारझोड करण्याबरोबरच बाहेरून आणलेल्या गुंडांकडून दहशतही पसरवली होती. त्यावेळी जुन्या प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी कायमचेच राजकारण सोडले. 

मात्र, त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत. ही टीका करणारे त्यावेळी गायब झालेल्या व्यक्तींमागचे गूढ सांगतील काय ? असा सवाल करत स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली तेलीआळी येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

परशुराम उपरकर म्हणाले, काही जण आता आत्मक्लेश करीत आहेत. मात्र, त्यावेळी नितेश राणेंच्या विजयासाठी स्वतः त्यांनी किती प्रयत्न केले, याचेही चिंतन करावे. प्रमोद जठार आज नारायण राणे, नितेश राणेंचे गोडवे गात उदोउदो करत आहेत. मात्र, आपल्या आमदारकीच्या निवडणुकीच्यावेळी ते त्यांच्यावर कोणते आरोप करीत होते. याचा त्यांनीच विचार करावा. 

कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करणारे सोयीनुसार व आपल्या वैयक्तिक फायद्यानुसार पक्षबदल करून एकमेकांवर टीका करीत असतात. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जिल्हा बँक अध्यक्ष तर कोणी महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळवणारे त्यावेळी राणेंचे गोडवे गात होते.त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने एकमेकांवर टीका करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना मतांच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे. कोकण ही परशुरामाची भूमी असून या भूमीत जे करायचे ते इथेच फेडायचे आहे. याचा विचार सर्वांनीच करून तसे वागावे आणि जनहित साधण्यासाठी प्रयत्न करावेत असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग