अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी, वेताळ-बांबर्डे येथील घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2023 14:30 IST2023-06-24T14:29:31+5:302023-06-24T14:30:52+5:30

जखमी महिलेला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

Pedestrian woman seriously injured in collision with unknown vehicle, Incident at Vetal Bambarde in Sindhudurga | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी, वेताळ-बांबर्डे येथील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी, वेताळ-बांबर्डे येथील घटना

कुडाळ (सिंधुदुर्ग) : अज्ञात वाहनाच्या धडकेत वेताळ- बांबर्डे तेलीवाडी येथे एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित महिलेची ओळख पटू शकलेली नाही. हा अपघात काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. 

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ दिनेश शिरवलकर, विराज शिरवलकर यांनी पोलिस यंत्रणा तसेच रुग्णवाहिका बोलवून महिलेला अधिक उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. महिलेला ठोकरून वाहन चालक फरार झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेऊन वाहने चालवावित असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Web Title: Pedestrian woman seriously injured in collision with unknown vehicle, Incident at Vetal Bambarde in Sindhudurga