मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या कामास वेग, नोएडा येथून कामाचे पार्ट दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:16 IST2025-02-14T17:12:11+5:302025-02-14T17:16:58+5:30
मालवण : बहुचर्चित मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीच्या कामास वेग आला असून, या ...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या कामास वेग, नोएडा येथून कामाचे पार्ट दाखल
मालवण : बहुचर्चित मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीच्या कामास वेग आला असून, या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम जवळ-जवळ ९० टक्के पूर्ण झाले असतानाच गुरुवारी नोएडा (उत्तर प्रदेश) येथून या पुतळा उभारणीच्या कामातील काही साहित्य भल्या मोठ्या ट्रकातून मालवणात दाखल झाले आहे. गुरुवारी ट्रकमधून दाखल झालेले शिवपुतळ्याच्या खालील खडकरूपी बेस आणण्यात आला आहे. दुपारी मालवणात हे पुतळ्याचे तीन बेस दाखल झाले आहेत.
मालवणच्या सागरी महामार्गावर अवाढव्य असणारे हे तीनही उतरविण्यात आले आहेत. सहा दिवसांपूर्वी नोएडा उत्तर प्रदेश येथून श्री राम सुतार आर्ट क्रिएशन यांच्या कंपनीतून हे पार्ट आणण्यात आले आहेत. ३० बाय ३० फूट लांबीचे हे पार्ट खडकरूपी असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र किणी यांनी दिली आहे.