कट्टर राणे समर्थक बाबू सावंत यांचा पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 18:47 IST2021-04-16T18:45:12+5:302021-04-16T18:47:22+5:30
Politics Sawatnwadi Sindhdurg : सावंतवाडी पंचायत समितीचे माजगाव मतदारसंघाचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा गुरुवारी सभापती निकिता सावंत यांच्याकडे सुपुर्द केला आहे. सावंत हे कट्टर राणे समर्थक आहेत.

कट्टर राणे समर्थक बाबू सावंत यांचा पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा
सावंतवाडी : सावंतवाडीपंचायत समितीचे माजगाव मतदारसंघाचे सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा सभापती निकिता सावंत यांच्याकडे सुपुर्द केला आहे. सावंत हे कट्टर राणे समर्थक आहेत.
याबाबत सभापती सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, श्रीकृष्ण सावंत यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये म्हणून त्यांची समजूत काढली पण ते राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब घालणार आहे. मात्र, अद्याप राजीनाम्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, श्रीकृष्ण सावंत यांनी आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. आपल्या वैयक्तिक कारणामुळे तसेच मतदारसंघात निधी आणू न शकल्यामुळे सावंत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपण आपल्या सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे दिला आहे. पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षाचे काम मी करीतच राहीन, अशी ग्वाही देखील बाबू सावंत यांनी यावेळी दिली.