अस्तित्व टिकवीण्यासाठी विरोधकांचा कृषी कायद्याला विरोध  : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 10:38 AM2021-01-08T10:38:56+5:302021-01-08T10:41:40+5:30

Bjp chandrakant patil Sindhudurg Rally- देशातील भाजपा विरोधकांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या किती जागा निवडून येतील याची खात्री आता काँग्रेससह सर्वच विरोधकांना राहिलेली नाही.त्यामुळे ते शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध करत आहेत. देशातील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोलन करत आहेत . अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Opposition to Agriculture Act to survive: Chandrakant Patil | अस्तित्व टिकवीण्यासाठी विरोधकांचा कृषी कायद्याला विरोध  : चंद्रकांत पाटील

अस्तित्व टिकवीण्यासाठी विरोधकांचा कृषी कायद्याला विरोध  : चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देअस्तित्व टिकवीण्यासाठी विरोधकांचा कृषी कायद्याला विरोध  : चंद्रकांत पाटील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोलन

कणकवली : देशातील भाजपा विरोधकांना आपल्या अस्तित्वाची चिंता आहे. नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या किती जागा निवडून येतील याची खात्री आता काँग्रेससह सर्वच विरोधकांना राहिलेली नाही.त्यामुळे ते शेतकर्‍यांची ढाल करून कृषि विधेयकाला विरोध करत आहेत. देशातील मूठभर शेतकऱ्यांना घेऊन दलालांच्या मदतीने मोदी विरोधक आंदोलन करत आहेत . अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

कणकवली येथे केंद्र शासनाच्या कृषि विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाच्यावतीने गुरुवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्यानंतर भाजपा कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच कृषि कायद्याचेही समर्थन केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक,माजी आमदार ऍड. अजित गोगटे, महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेल्या कृषि कायद्याला शेतकरी नव्हे तर व्यापारी विरोध करत आहेत. व्यापार्‍यांना सगळा कृषि माल बाजार समितीमध्येच आणायचा आहे. जेणे करून दलालांचाच फायदा होईल. रूमालाखाली दर ठरेल आणि शेतकर्‍यांच्या हातात तुटपुंजी रक्कम येईल.

विरोधक अफवा पसरत आहेत. कृषि समिती बाहेर माल विकला तर शेतकर्‍यांची फसवणूक होईल असे सांगत आहेत. पण मी पण शेतकर्‍याचा मुलगा आहे. आमची अडीच एकर शेती आहे. आम्हाला वेडे समजू नका. तुम्ही आतमध्ये काटा मारता. आम्ही बाजार समिती बाहेर बसून माल विकू आमचा इलेक्ट्रॉनिक काटा लावू आणि फसवणूक होऊ देणार नाही.

शेतकऱ्यांच्या प्रतिसादाची विरोधकांना भीती !

मोदी सरकारने वर्षाला शेतकर्‍यांना ६ हजार रूपये मिळण्याची तरतूद केली. तसेच शेतमजूरांना ३ हजार रूपये पेन्शनची व्यवस्था केली. शेतकर्‍यांच्या या प्रेमामुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये भरभरून साथ मिळाली असून भाजपाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले आहेत.

शेतकऱ्यांची आणखीन सहानुभूती भाजपाला मिळाली तर त्यापेक्षाही अधिक ताकद २०२४ मध्ये दिसेल.तसेच तीन चतुर्थांश बहुमत संसदेत भाजपाला मिळाले तर गेली अनेक वर्षे अपूर्ण राहिलेले जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. त्याची भीती विरोधी पक्षाना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मोदींना सतत विरोध करत आहेत.असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


 

Web Title: Opposition to Agriculture Act to survive: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.