शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाळू पट्ट्यांच्या लिलावाला विरोध, भाग संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:01 IST

malvan, sand, chipi, sindhudurgnews कर्ली खाडीपात्रातील वाळूपट्ट्यांचे लिलाव प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला मालवण तालुक्यातील आंबेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट डी व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे वाळू पट्ट्यांच्या लिलावाला विरोध, भाग संवेदनशील आंबेरी, चिपी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्ग : कर्ली खाडीपात्रातील वाळूपट्ट्यांचे लिलाव प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला मालवण तालुक्यातील आंबेरी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट डी व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या ठिकाणी निसर्गनिर्मित बेटे, खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत मत्स्यपालन शेती करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी कर्तव्यतत्पर महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल न मागविता स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी आणि वाळू उपसा करण्यास परवानगी देऊ नये. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडू, असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वाळू पट्ट्यांचे लिलाव करण्याची कार्यवाही सुरू केली असून लवकरच त्यांचे लिलाव होणार आहेत. यात कर्ली खाडीतील वाळूपट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्ली खाडीतील वाळूपट्ट्यांचा लिलाव करताना गट डी आणि ई मधील वाळू लिलाव करण्यास मालवण तालुक्यातील वाघवणे देवली, आंबेरी वाकवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

 लिलाव करण्यात येणाऱ्या या खाडीपात्रातील गट डी व ई हे भाग अत्यंत संवेदनशील असून या ठिकाणी वाळू उपसा करण्यात परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्रामस्थ किशोर वाक्कर, वीरेश मांजरेकर, मनोज वाक्कर, निलेश मांजरेकर, सदानंद गोरे, दीपक चव्हाण, राजीव नाईक आदी उपस्थित होते.कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून दिखावू कारवाईकर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत असल्याकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यावर महसूलच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी केवळ बंद असलेल्या रॅम्पवर कारवाई केली. तसेच काही ठिकाणी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी दिखावू कारवाई केली. मात्र, रॅम्प पुन्हा कार्यरत झाले आहेत. याकडे दुर्लक्ष केला जात आहे. याबाबत या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. वाळू पट्ट्यांचे लिलाव करताना नजीकच्या ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींचा विचार होणे आवश्यक आहे. यात प्रशासनाने घिसाडघाई करून चालणार नाही.बंधारे, बेटे धोक्यातसागरी महामार्गावरील पुलाजवळ कर्ली खाडीतील गट डी आणि ई अंतर्गत येणाऱ्या उपगटात निसर्गनिर्मित बेटे आहेत. खार बंधारे तसेच उमेद योजनेंतर्गत सुरू असलेली मस्त्यपालन शेती यात येत आहे. या ठिकाणच्या वाळूचा लिलाव झाल्यास निसर्ग निर्मित बेटे, खार बंधारे आणि मत्स्य शेतीला ते घातक ठरणार आहे.

टॅग्स :sandवाळूMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गChipi airportचिपी विमानतळ