कणकवलीत चौपदरीकरण मोजणीला विरोध
By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-28T23:05:51+5:302015-05-29T00:01:11+5:30
प्रांताधिकाऱ्यांना याबाबत कळवून मोजणी अधिकाऱ्यांनी पंचयादी घालून मोजणी थांबविली.

कणकवलीत चौपदरीकरण मोजणीला विरोध
कणकवली : शहरात गुरुवारी चौपदरीकरणांतर्गत सुरू झालेली मोजणी दुपारी रोखण्यात आली. महामार्गाशेजारी असलेले कणकवलीवासीयांचे श्रद्धास्थान गांगो मंदिर चौपदरीकरणांतर्गत अर्धेअधिक जात असल्याने मोजणी रोखण्यात
आली. मंदिर चौपदरीकरणात जात असेल तर आमचा विरोध राहील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. प्रांताधिकाऱ्यांना याबाबत कळवून मोजणी अधिकाऱ्यांनी पंचयादी घालून मोजणी थांबविली.गुरुवारी सकाळपासून शहरातील मोजणी जानवली पुलापासून सुरू करण्यात आली. गांगोमंदिरापर्यंत सुरळीत मोजणी झाली. यावेळी भूमिअभिलेखच्या भूमापक आर. आर. भोगटे, वाल्मीकी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. गांगो मंदिराकडे मोजणीसाठी अधिकारी आले असता नगरसेविका माधुरी गायकवाड, सोमा गायकवाड, सचिन म्हाडगुत, आनंद राणे, आदी उपस्थित झाले आणि त्यांनी मोजणीला विरोध केला. मोजणीसाठी महसूलचे सक्षम अधिकारी उपस्थित नाहीत. रात्रीच्या वेळी नीस टाकण्यात आले आहेत. तसेच महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याआधी गांगो मंदिर चौपदरीकरणात जाणार नाही, असे सांगितले होते. (प्रतिनिधी)