शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘...तरच एस. टी. फायद्यात येईल’

By admin | Updated: January 8, 2015 00:00 IST

सुनील ताकवले : विजयदुर्ग येथे सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन

पुरळ : एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाच्या दक्षतेमुळे आजवर एसटी महामंडळ हे प्रवाशांचे हक्काचे स्थान झाले आहे. मात्र, आपण नोकरी करीत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याने एसटी हे केवळ आपले उत्पन्नाचे साधन आहे, एवढ्यापुरते मर्यादित न राहता स्वत:चे घर समजून काम केले तर भविष्यात एसटी महामंडळ निश्चित फायद्यात येईल, असा विश्वास बँक आॅफ इंडियाचे सहायक शाखाधिकारी सुनील ताकवले यांनी विजयदुर्ग येथे स्पष्ट केले.या आगारातर्फे सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. हा सप्ताह १० जानेवारीपर्यंत होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ताकवले उपस्थित होते. त्यांनी सुरक्षा आणि स्वच्छता यासंदर्भात उहापोह केला. दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी २०१४ सालातील अपघाताबाबतची आकडेवारी विषद केली. जिल्ह्यातील आगारामध्ये झालेल्या ६० अपघातांपैकी केवळ एकच अपघात विजयदुर्ग आगाराच्या गाडीला झाल्याचे सांगितले. एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेबाबत कटाक्षाने काळजी घेत आहे. आगारातील मार्ग बिघाड होण्याचे प्रमाणही कमी होते, असे ते म्हणाले.यावेळी सहायक वाहतूक निरीक्षक एस. एस. डोंगरे, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एस. बी. नाईक व के. एस. खाडये यांचा, चालक आर. के. ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी. पी. पवार यांनी केले. (वार्ताहर)