वाशी अपघातात एकजण ठार, नांदगाव मुस्लिमवाडीवर शोककळा : दोन वाहनांमध्ये झाली धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:34 IST2018-07-18T15:32:58+5:302018-07-18T15:34:30+5:30
नेरुळ (वाशी) येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात नांदगाव मुस्लिमवाडी येथील टेम्पोचालक रमजान नावलेकर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान घडला.

नेरुळ (वाशी) येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात नांदगाव मुस्लिमवाडी येथील चालक रमजान नावलेकर यांचा जागीच मृत्यू झाला.
तळेरे : नेरुळ (वाशी) येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात नांदगाव मुस्लिमवाडी येथील टेम्पोचालक रमजान नावलेकर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान घडला.
नांदगाव मुस्लिमवाडी येथील रमजान अब्दुल नावलेकर हे आपल्या ताब्यातील टेम्पो (एम. एच. ०७, पी. ०४२८) घेऊन नेहमीप्रमाणे भाडे घेऊन मुंबई वाशी येथे गेले होते. मंगळवारी पहाटे ते गावी येण्यासाठी निघाले असता नेरुळ येथे पुढे असलेल्या डंपरला त्यांच्या टेम्पोची धडक बसली. ही धडक एवढी भयंकर होती की, रमजान यांचा जागीच मृत्यू झाला.
वटपौर्णिमेसाठी मुंबईत फणस घेऊन जात असताना देवेंद्र आणि जयवंत बिडये यांच्या अपघाती निधनाची घटना ताजी असतानाच या आणखी एका दुर्दैवी घटनेची माहिती समजताच नांदगावावर शोककळा पसरली. नांदगाव येथील रमजान यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने ताबडतोब मुंबईला धाव घेतली.
रमजान यांचा नांदगाव व तळेरे परिसरात मोठा मित्र परिवार आहे. रमजान सुरुवातीला सहाआसनी रिक्षा व्यवसाय करायचे. तसेच नांदगाव परिसरात वेळप्रसंगी ते नेहमीच मदतीसाठी पुढे असायचे. या अपघाताचे वृत्त समजताच नावलेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रमजान यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.