शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला धडकून एक ठार शिरगाव धोपटेवाडी येथील घटना

By admin | Updated: May 24, 2014 01:08 IST

मृत मोटरसायकलस्वार भोमचा

 शिरगांव : देवगड-नांदगाव मार्गावर शिरगांव धोपटेवाडी येथे ट्रकला पाठीमागून मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात वैभववाडी तालुक्यातील भोम येथील आनंद हरिश्चंद्र सावंत (वय ४०) यांचे निधन झाले. तर मोटारसायकल चालक जखमी झाला. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. वैभववाडी तालुक्यातील भोम येथील आनंद सावंत व नामदेव जाधव हे यामाहा वायबीआर क्र. (एमएच ०७, यु- ३७९७) घेऊन देवगडला जात होते. नामदेव जाधव हे मोटारसायकल चालवत होते. नांदगाव-देवगड याच मार्गावर चिरे भरण्यासाठी चिरेखाणीवर ट्रक जात असताना नामदेव जाधव यांच्यापुढे असलेल्या ट्रकच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने नामदेव जाधव यांना त्यांची मोटारसायकलचा वेग आवरता न आल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेने मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेले आनंद सावंत हे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रूग्णवाहिकेतून कणकवली येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक थांबला नाही. त्यामुळे तो ट्रक कोणाच्या मालकीचा होता हे समजू शकले नाही. अपघातात मोटारसायकलच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. आनंद सावंत हे गवंडी कामगार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई-वडील असा परिवार आहे. भोम येथे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शोककळा पसरली. अपघातस्थळाचा शिरगांव पोलीस दूरक्षेत्राचे दूरक्षेत्र अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक वरवडेकर, भूषण सुतार यांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी)