कांदळगावात एकाचा अज्ञात तापाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:41 IST2019-11-01T15:38:45+5:302019-11-01T15:41:09+5:30
कांदळगाव परबवाडी येथील रहिवासी सुभाष जगन्नाथ वायंगणकर (६२) यांचे अज्ञात तापाने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांना चार दिवस ताप येत होता. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, रात्री प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कांदळगावात एकाचा अज्ञात तापाने मृत्यू
मालवण : कांदळगाव परबवाडी येथील रहिवासी सुभाष जगन्नाथ वायंगणकर (६२) यांचे अज्ञात तापाने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांना चार दिवस ताप येत होता. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, रात्री प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सुभाष वायंगणकर यांना गेले काही दिवस ताप येत होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला होता.
यात त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह मालवण येथील शवागृहात ठेवला होता. त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.