पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू, खारेपाटण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:23 IST2022-04-27T17:21:44+5:302022-04-27T17:23:20+5:30

पायी चालत जात असतानाच अचानक पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

One dies after falling from Pimpal tree branch in Kharepatan | पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू, खारेपाटण येथील घटना

पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू, खारेपाटण येथील घटना

कणकवली/खारेपाटण : पायी चालत जात असतानाच अचानक पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. खारेपाटण भैरीआळी येथील रहिवासी अनंत शांताराम शेलार (वय-५५) असे या मृताचे नाव आहे. ही घटना आज, बुधवारी दुपारी ३.३० वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

याबाबत माहिती अशी की, अनंत शेलार हे पिंपळाच्या झाडाखालून पायी चालत जात असताना त्यांच्या अंगावर झाडाची मोठी फांदी पडली. त्यात शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. तर याच रस्त्यावर बाजूला सुरेश गायकवाड यांच्या शेळ्यांच्या कौलारू गोठयावर देखील पिपळाच्या झाडाची फांदी पडून त्यांच्या गोठा व घराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह झाडाखालून बाहेर काढण्यास ग्रामस्थांच्या सहाय्याने मदत केली.

Web Title: One dies after falling from Pimpal tree branch in Kharepatan