Sindhudurg: कीटकनाशक पिऊन एकाने संपवले जीवन, नेमकं कारण अस्पष्ट
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 20, 2024 19:05 IST2024-02-20T19:04:49+5:302024-02-20T19:05:18+5:30
शिरगाव ( सिंधुदुर्ग ) : देवगड तालुक्यातील कुवळे-तर्फेवाडी येथील विवाहित सुधीर रघुनाथ पवार (४४) या युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या ...

Sindhudurg: कीटकनाशक पिऊन एकाने संपवले जीवन, नेमकं कारण अस्पष्ट
शिरगाव (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यातील कुवळे-तर्फेवाडी येथील विवाहित सुधीर रघुनाथ पवार (४४) या युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना काल, सोमवारी (दि.१९) घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुवळे तर्फेवाडी येथील सुधीर पवार याने कीटकनाशक प्राशन केल्याचे समजताच त्याला तातडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. परंतु उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. याबाबतची माहिती त्यांची पत्नी सविता पवार यांनी देवगड पोलिस ठाण्यात दिली.
शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सुधीर पवार यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास देवगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव दूरक्षेत्र अंमलदार महेंद्र महाडीक करीत आहेत.