कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 16:15 IST2021-12-08T16:14:40+5:302021-12-08T16:15:04+5:30
घराच्या मागील बाजूस लपवून ठेवलेला २३९ ग्रॅम ९ हजार ६४० किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला.

कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या एकास अटक
कणकवली: कणकवली तालुक्यातील एकाला गांजा विक्री प्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वारगाव, रोडयेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात प्रवीण आत्माराम गुरव (वय-५०) याच्या घराच्या मागील बाजूस लपवून ठेवलेला २३९ ग्रॅम ९ हजार ६४० किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत संशयित आरोपी गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी आरोपी प्रविण गुरव याला अटक करण्यात आली आहे. कणकवली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार कृष्णा केसरकर, आशिष गंगावणे, पोलीस नाईक संकेत खाडये, चंद्रहास नार्वेकर, महिला पोलीस सुवर्णा माधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तर, कणकवली तालुक्यातील अंमली पदार्थांचे कनेक्शन समोर आले. या आरोपीशी जोडलेल्या संबंधितांचा शोध घेत कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.