कणकवली : कलमठ गुरववाडी येथील प्रसाद रवींद्र मुळे यांची दुचाकी चोरी प्रकरणी संशयित आरोपी पराग चंद्रशेखर सावंत (२७, रा. तेलीआळी, कणकवली) याला कणकवली पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.प्रसाद मुळे यांची दुचाकी क्रमांक (एम. एच.०७ व्ही. ०३६८ ) ही चोरीस गेल्याची घटना १८ मार्च रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.प्रसाद मुळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर तपासा अंती समोर आलेल्या आरोपीला दुचाकी चोरी प्रकरणात कणकवली पोलिसांनी ३० मार्च रोजी राहत्या घरातून ताब्यात घेतले. तसेच अधिक चौकशी अंती अटक केली होती.संबंधित आरोपीला ३१ मार्च रोजी कणकवली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सावंत करीत आहेत.
कणकवलीतील एकास दुचाकी चोरीप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 11:25 IST
Crime News Police Sindhudurg- कलमठ गुरववाडी येथील प्रसाद रवींद्र मुळे यांची दुचाकी चोरी प्रकरणी संशयित आरोपी पराग चंद्रशेखर सावंत (२७, रा. तेलीआळी, कणकवली) याला कणकवली पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कणकवलीतील एकास दुचाकी चोरीप्रकरणी अटक
ठळक मुद्देकणकवलीतील एकास दुचाकी चोरीप्रकरणी अटक कलमठ येथील घटना : आरोपीस पोलीस कोठडी