शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सासोलीत ओंकार हत्तीचे आगमन; शेतकरी चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:20 IST

वनविभागाची टीम हत्तीच्या मागावर असून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

दोडामार्ग : सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा सासोली गावात पोहोचला आहे. पुन्हा तो गोव्याच्या दिशेने जाणार की बांदा परिसरात जाणार हे महत्वाचे आहे.ऐन काजू हंगामात पुन्हा एकदा सासोली परिसरात ओंकार दाखल झाला असून, काजू गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास सासोली येथील जंगलात शेतकरी काजू गोळा करत असताना हा हत्ती त्यांच्या नजरेस पडला. ऐन हंगामातच हत्ती दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी दिली.दरम्यान, वनविभागाची टीम हत्तीच्या मागावर असून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी विशेषतः काजू गोळा करताना जंगल भागात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. हत्तीच्या उपस्थितीमुळे काजू हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Elephant 'Onkar' Arrives in Sasoli, Sindhudurg; Farmers Worried

Web Summary : Elephant 'Onkar' reached Sasoli, Sindhudurg, creating fear among cashew farmers. Its presence during cashew season worries farmers. Forest department closely monitors the elephant, advising caution.