Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 05:37 PM2021-07-15T17:37:52+5:302021-07-15T17:38:34+5:30

Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

Now the supply of vaccines will increase: Uday Samant | Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

Next
ठळक मुद्देआता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

यापुढे लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून केंद्राकडून लसीचा पुरवठा किती होतो त्यावर लसीकरणाचा वेग अवलंबून राहणार आहे.

केंद्रात जिल्ह्यातील मंत्री आहेत तेव्हा लसीचा पुरवठा वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी राणे यांचे नाव न घेता लगावला.

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे.

18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित रहावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

 वैभववाडी तालुक्यात वैभववाडी - 260, उंबर्डे - 200. कणकवली तालुक्यात खारेपाटण - 200, कासार्डे - 200, कनेडी - 200, फोंडा - 200, कळसुली - 200, वरवडे - 200, नांदगाव - 200, उपजिल्हा रुग्णालय कणकवली - 260. देवगड तालुक्यात पडेल 200, मोंड - 200, फणसगाव - 200, मिठबांव - 200, इळिये - 200, शिरगाव -200, ग्रामीण रुग्णालय देवगड - 260. मालवण तालुक्यात आचरा - 200, मसुरे - 200, चौके - 200, गोळवण - 200, हिवाळे - 200, पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालय 100, मालवण ग्रामीण रुग्णालय 260. कुडाळ तालुक्यात कडावल - 200, कसाल - 200, पणदूर - 200,हिर्लोक - 200, माणगाव - 200, वालावल - 200, कुडाळ ग्रामीण रुग्णालय 260, जिल्हा सामान्य रुग्णालय - 260. वेंगुर्ला तालुक्यात परुळा - 200, अडेली - 200, तुळस - 200, रेडी - 200, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय - 250, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा - 100, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड - 200, सांगेली - 200, निरवडे - 200, आंबोली - 200, बांदा - 200, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी - 260. दोडामार्ग तालुक्यात भेडशी - 200, मोरगाव - 200, तळकट - 200, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग  - 260 अशा एकूण 9 हजार 930 लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत. 

Web Title: Now the supply of vaccines will increase: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.