ना देवस्वाऱ्यांचे, ना भाविकांचे स्नान, कुणकेश्वर यात्रोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:24 IST2021-03-13T17:21:01+5:302021-03-13T17:24:54+5:30

corona virus Religious Places sindhudurg- कुणकेश्वर येथील महाशिरात्रौत्सवाची आज अमावास्येचा पर्वणी योगावर सांगता झाली असून ना देवस्वाऱ्यांचे स्नान ना भाविकांचे स्नान अशा साध्या पध्दतीतच यात्रोत्सवाची सांगता झालीआहे.

No bathing of devotees, no bathing of devotees, no conclusion of Kunkeshwar Yatra | ना देवस्वाऱ्यांचे, ना भाविकांचे स्नान, कुणकेश्वर यात्रोत्सवाची सांगता

ना देवस्वाऱ्यांचे, ना भाविकांचे स्नान, कुणकेश्वर यात्रोत्सवाची सांगता

ठळक मुद्देना देवस्वाऱ्यांचे, ना भाविकांचे स्नान केवळ धार्मिक विधी पार पाडून कुणकेश्वर यात्रोत्सवाची सांगता

देवगड : कुणकेश्वर येथील महाशिरात्रौत्सवाची आज अमावास्येचा पर्वणी योगावर सांगता झाली असून ना देवस्वाऱ्यांचे स्नान ना भाविकांचे स्नान अशा साध्या पध्दतीतच यात्रोत्सवाची सांगता झालीआहे.

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली मात्र दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत भरणारी कुणकेश्वर यात्रा यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीत सुरू झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने व प्रशासनाने यात्रोत्सव साध्या पध्दतीत, ग्रामस्तरावर आयोजित करण्याचे निर्देश दिल्याने कुणकेश्वर यात्रेला स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

बाहेरून येणाऱ्या भाविक, भक्तांना, यात्रेकरूंना, पर्यटकांना, व्यापारी वर्गांना तसेच आजुबाजुच्या व्यक्तिंना यात्रा कालावधीत येवू नये असे आवाहन केल्याने दुसऱ्या दिवशीही कुणकेश्वर यात्रा परस्पर सुना सुना होता.

दरवर्षी भाविकांच्या उच्चांकी गर्दीमुळे फूलून गेलेला मंदीर परिसर, दुतर्फा खाद्यपदार्थ, खेळणी विविध प्रकारची दुकाने, आकाशपाळणे यामुळे गजबजलेली यात्रा यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर साध्या पध्दतीने झाल्याने सुन्नीसुन्नी होती.

आर्थिक उलाढाल ठप्प

कोरोना पार्श्वभूमीवर देवस्वाऱ्यांही येणार नसल्याने देवस्वाऱ्यांच्या तिर्थस्नानाशिवाय यात्रेची सांगता झाली. यावर्षीची यात्रा ना भाविकांची गर्दी, ना व्यापारीवर्गाची दोन्ही बाजुंनी थाटलेली दुकाने, ना भजनांची धुम अशा स्थितीत पार पडत असल्याने कुणकेश्वरमधील आर्थिक उलाढालही ठप्प झाली. केवळ धार्मिक विधी पार पाडून यात्रेची सांगता झाली आहे.

Web Title: No bathing of devotees, no bathing of devotees, no conclusion of Kunkeshwar Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.