शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समय बलवान हे.., न्यायालयात शरण जाण्यापूर्वी नितेश राणेंची फेसबुकवर पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:27 IST

आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पी. चिदंबरम यांचा फोटो पोस्ट केला आहे

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे. यातच आज नितेश राणे यांनी आपला जामीन अर्ज मागे घेवून पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा व पी. चिदंबरम यांचा फोटो पोस्ट केला आहे.पोस्टमध्ये गृहमंत्री अमित शहा व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या फोटोखाली त्यांनी 'समय बलवान हे इन्सान खामो खा गुरूर करता हे' असे कॅप्शन देखील दिले आहे. शहा व चिदंबरम यांना पोलिसांनी अटक केलेला हा फोटो आहे. याच प्रमाणे आपल्यावरही अटकेची कारवाई होत असल्याने भविष्यात आपण याची परतफेड करू असेच यातून ते दर्शवत आहेत.गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात दंगली प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी युपीए मध्ये केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम होते पण नंतर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा असताना चिदंबरम यांना ही एका गुन्हयात सीबीआय कडून अटक करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात आपण याची परतफेड करु असा इशाराच त्यांनी यातून दिला असल्याची चर्चा रंगली आहे.आमदार नितेश राणे यांच्या अटकेवरुन सिंधुदुर्गन्यायालयाबाहेर त्यांची गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी ओरोस पोलिसांनी काल, मंगळवारी निलेश यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे भविष्यात पोलीस-राणे कुटुंबीयातील संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे PoliceपोलिसCourtन्यायालय