Nitesh Rane: नितेश राणे आयसीयूत, मग फटाके कसले वाजवता; दिपक केसरकरांचा राणे समर्थकांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 21:05 IST2022-02-09T21:04:52+5:302022-02-09T21:05:09+5:30
आमदार राणे हे दोनदा जेलमध्ये जाऊन आले आहेत. मग आता न्यायालयीन कोठडीत बाहेर आले म्हणून फटाके वाजवणे कितपत योग्य आहे, असे केसरकर म्हणाले.

Nitesh Rane: नितेश राणे आयसीयूत, मग फटाके कसले वाजवता; दिपक केसरकरांचा राणे समर्थकांना सवाल
सावंतवाडी : आपला नेता अतिदक्षता विभागात असताना त्यांना जामिन मंजूर झाल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत आता तरी आमदार नितेश राणे यांनी सुधरावे असा सल्ला आमदार दीपक केसरकर यांनी दिला ते बुधवारी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी केसरकर म्हणाले,पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आता नव्याने संकुल बांधण्यात येणार आहे. त्यात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ सेवा बजावणाऱ्या कामगारांना मालकी तत्वावर राहण्याची संधी दिली जाणार आहे. तर ज्या लोकांनी अजून दोन लस घेतल्या नाहीत त्यांच्या घरी जावून मी त्यांना आवाहन करणार आहे. आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी लस घेतल्या पाहिजे असे आवाहन त्यानी यावेळी केले.
आमदार राणे हे दोनदा जेलमध्ये जाऊन आले आहेत. मग आता न्यायालयीन कोठडीत बाहेर आले म्हणून फटाके वाजवणे कितपत योग्य आहे आपला नेता अतिदक्षता विभागात होता त्याची तब्येत खालावली असतना असे फटाके वाजवू नये असा सल्लाही त्यांनी दिले ते तरुण आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी स्वतःला सुधारतील अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली.
नगर पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. भाडेवाढीची वसुली थांबवून जुन्याच दराने एक ते दिड वर्षाचे भाडे भरून घेतले जाणार आहे. तर उर्वरीत भाडे हे त्रिस्तरीय समितीच्या निर्णयानंतर टप्प्याटप्याने घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. याबाबत मी आज बैठक घेतली यावेळी व्यापारी तसेच नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.तसेच इंदिरा गांधी संकुलातील काहि समस्या ही आहेत त्या सोडवणार असल्याचे केसरकर म्हणाले.