शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

नीलेश राणेंना बळीचा बकरा केला जातोय, शिंदेसेनेचे नेते का बोलत नाहीत; मंत्री नितेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:23 IST

Local Body Election: राणे विरोधात कटकारस्थाने कोणी रचली, दीपक केसरकरांनी उत्तर द्यावे  

सावंतवाडी : नीलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय. उद्योगमंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर यांच्यासह अन्य शिंदेसेनेचे नेते का बोलत नाहीत ? असा सवाल मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केला. नारायण राणे यांना कटकारस्थान करून संपविले जाते म्हणणाऱ्यांनी २०१४ ते २०२४ पर्यत राणे कुटुंबांविरोधात षडयंत्र कोणी रचले, कोणी गुन्हे दाखल केले, कोण विरोधात वागले हे जनतेला माहीत असून केसरकर यांचे म्हणणे निव्वळ हास्यास्पद असल्याची टीका राणे यांनी केली.मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी राजवाडा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, सावंतवाडी, वेंगुर्ले, कणकवली व मालवण नगरपरिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. भाजप म्हणून आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढत आहोत. मतदारांपर्यंत 'डोअर टू डोअर' आम्ही पोहचत असून विकासाच्यामुद्यावर ही निवडणूक लढवली जात आहे. आम्ही सावंतवाडीची सुंदरवाडी ही ओळख अजून भक्कम करण्याचा काम श्रध्दा सावंत भोंसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. दरम्यान, केसरकर आपल्या आजारपणावर बोलतात पण आजारपण व निवडणुकीचा संबंध काय आहे? राजघराण्याच्या आशीर्वादान पुढचा प्रवास चांगला करण्यासाठी आमचा हेतू आहे. राजघराण्याला पाठिंबा नाही असं दीपक केसरकर यांनी सांगावं. केसरकर लवकर ठणठणीत व्हावेत हीच आमची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. 

वाचा- माझे लढे व्यक्तीविरुद्ध नव्हते, तर..; मंत्री नितेश राणे यांना दीपक केसरकरांचे प्रत्युत्तरआम्हाला सगळं माहीत आहे केसरकर म्हणतात राणेना संपविण्याचा डाव आहे. पण २०१४ ला नारायण राणेंची प्रतिमा खराब करण्याची सुरूवात केली ? नीलेश राणेंच्या विरोधात खासदारकीला शडडू कुणी ठोकला ? आज तेच म्हणातात राणेंच्या विरोधात कट रचला जातो, हे हास्यास्पद आहे. भाजपने आम्हाला आशीर्वाद, पद दिली. नारायण राणेंना केंद्रीय मंत्री करण्याचं काम भाजपने केल. आम्हाला कोणी जेलमध्ये टाकलं ? केसीस घातल्या हे सगळं माहित आहे असा टोला केसरकर हाणला‌. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitesh Rane Alleges Conspiracy Against Nilesh Rane; Questions Shinde Sena's Silence

Web Summary : Minister Nitesh Rane alleges Nilesh Rane is being scapegoated. He questions why Shinde Sena leaders are silent. Rane criticizes Deepak Kesarkar's remarks as laughable, reminding everyone who conspired against the Rane family from 2014-2024. He highlighted BJP's support, contrasting it with past persecutions.