शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: January 8, 2015 00:04 IST

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांची २०२ वी जयंती साजरी होताना पत्रकारांबरोबरच सिंधुदुर्गवासीयांनाही अभिमान

वेंगुर्ले : वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून जगात अनेक ठिकाणी क्रांती व जनआंदोलने उभी राहिली आहेत. ब्रिटिशांच्या विरुद्धचा स्वातंत्र्य लढा हा टिळक, आगरकर, गांधी यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून लढवून देशभर जनआंदोलन उभे केले आणि स्वातंत्र्यही मिळवून दिले. त्या वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांची २०२ वी जयंती साजरी होताना पत्रकारांबरोबरच सिंधुदुर्गवासीयांनाही अभिमान वाटतो, असे प्रतिपादन प्राचार्य के. जी. केळकर यांनी केले. येथील अ‍ॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या सभागृहात मराठी वृत्तपत्राचे आद्यजनक बाळशास्त्रीजांभेकर यांच्या २०२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य केळकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पूजा कर्पे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन वराडकर, सल्लागार प्रदीप सावंत, संघटक सुरेश कौलगेकर, सदस्य मॅक्सी कार्डाेज, विनायक वारंग, भरत सातोसकर, प्रथमेश गुरव, सावळाराम भराडकर, डॉ. संगीता मुळे, डॉ. प्रिया मराठे, डॉ. समता धुरी, डॉ. सतीश पाटील, शेखर साळगावकर, ऋषिकेश बिर्जे यांच्यासह कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रदीप सावंत, सुरेश कौलगेकर, डॉ. पूजा कर्पे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनकार्य आणि पत्रकारितेतील योगदान याबाबत मार्गदर्शन केले. विनायक वारंग यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)