सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: February 27, 2024 06:42 PM2024-02-27T18:42:54+5:302024-02-27T18:43:24+5:30

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची माहिती : ३४,९०१ मुलांना देणार लस

National Pulse Polio Vaccination Campaign on March 3 in Sindhudurg District | सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 

सिंधुदुर्ग : ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन शासनाच्या वतीने ३ मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ३४,९०१ बालकांना ९०७ लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार आहे. तसेच ८० मोबाईल टीम, ४९ ट्रान्सिट टीम याद्वारे जोखिमग्रस्त भाग, यात्रा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सई धुरी म्हणाल्या की, ३ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यादिवशी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून ३४ हजार ९०१ मुलांना ही लस दिली जाणार आहेत. यासाठी ९०७ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ८० मोबाईल टीम, ४९ ट्रान्सिट टीम याद्वारे जोखीमग्रस्त भाग, यात्रा या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पल्स पोलिओ लसीकरण दिनानंतर ग्रामीण भागामध्ये तीन दिवस व शहरी भागामध्ये पाच दिवस आय.पी.पो. आय द्वारे ९०९ टीम द्वारे २,०५,०२४ घरांना भेटी देऊन लसीकरण करण्यात येणार आहे. एकूण ४९ ट्रान्सिट टीमची स्थापना करण्यात आली असून याद्वारे एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्थानके, यात्रेच्या ठिकाणी, विमानतळ, टोलनाके इत्यादी ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

८० मोबाईल टीम

८० मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली असून याद्वारे तुरळक लाभार्थी असणाऱ्या ठिकाणी उदा. तुरळक वाड्या, वस्त्या, बांधकामाची ठिकाणे, खणी, ऊसतोड मजूर, वीटभट्ट्या, फुटपाथ इत्यादी ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या टीममध्ये २ कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्याकडे १ वाहन देण्यात येणार आहे.

Web Title: National Pulse Polio Vaccination Campaign on March 3 in Sindhudurg District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.