शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील नारी शक्तीनं केलं उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य; पवारांसह गृहराज्यमंत्र्याकडून तृप्ती मुळीक यांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 17:52 IST

मुळीक या सिंधुदुर्ग मोटार परिवहन विभागात कार्यरत असून अलिकडेच त्यांनी व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत.

अनंत जाधव -

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य खाकीतील नारी शक्तीने केल्याने सिंधुदुर्ग पोलिसाची मान अभिमानाने उंचावली आहे. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल तीन मंत्री आले होते त्या सर्वानी एकाच गाडीतून प्रवास केला. या गाडीचे सारथ्य महिला पोलीस कॉस्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले. त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी गावच्या रहिवासी असून सध्या त्या मोटर परिवहन विभागात कार्यरत आहेत. 

एखाद्या जिल्ह्यात व्हीआयपी मुमेंट म्हटले की पोलीसांना डोळ्यात तेल घालून त्याची सुरक्षा करावी लागते. यातच महत्वाचे मंत्री आले तर त्याच्या गाडीपासून ते ज्या रस्त्यावरून ते जाणार त्या रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्थाही पोलिसांना बघावी लागत असते. मात्र रविवारी सिंधुदुर्ग पोलीसांनी प्रथमच एक अभिनव उपक्रम राबवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या गाडीचे सारथ्य चक्क एका महिला पोलीसांच्या हाती दिले होते. 

यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटीलही उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या सोबत होते. चिपी विमानतळावरून ओरोस आणि नंतर पुन्हा चिपी विमानतळ, असा हा प्रवास होता. यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांनी या महिला पोलीसाचे कौतुकही केले. याच बरोबर राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसांकडून केले जाणे, ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

मुळीक या सिंधुदुर्ग मोटार परिवहन विभागात कार्यरत असून अलिकडेच त्यांनी व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने  23 डिसेंबर, 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, आजचा दिवस हा त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

मुळीक यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यानी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAjit Pawarअजित पवारUday Samantउदय सामंतPoliceपोलिस