नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा; कणकवलीत मुख्यमंत्र्यांसह राजकीय दिग्गजांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 19:45 IST2026-04-10T19:45:27+5:302026-04-10T19:45:34+5:30

एकाच विमानातून दिग्गज नेत्यांचा प्रवास

Narayan Rane's birthday celebration; Chief Minister and political dignitaries gather in Kankavali | नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा; कणकवलीत मुख्यमंत्र्यांसह राजकीय दिग्गजांची मांदियाळी

नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा; कणकवलीत मुख्यमंत्र्यांसह राजकीय दिग्गजांची मांदियाळी

कणकवली:माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवलीत राजकीय शक्तीप्रदर्शनासोबतच स्नेहाचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील दिग्गज नेत्यांची फौज कणकवलीत दाखल झाली आहे.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड हे सर्व नेते एकाच विमानाने चिपी विमानतळावर उतरले.

​विमानतळावर आमदार नितेश राणे यांनी या सर्व पाहुण्यांचे जल्लोषात आणि अगत्याने स्वागत केले. तेथून सर्व नेतेमंडळी राणे यांचे निवासस्थान असलेल्या 'ओम गणेश' येथे पोहोचली आहेत. काही वेळातच नडवे नाका येथे आयोजित भव्य सोहळ्याला हे सर्व नेते उपस्थित राहणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.

एकाच विमानातून दिग्गज नेत्यांचा प्रवास
​महायुतीमधील एकजूट आणि नारायण राणे यांचा राजकीय दबदबा आज पुन्हा एकदा दिसून आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री आणि दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष एकाच विमानाने कोकणात दाखल झाले. राजकीय वर्तुळात या प्रवासाची आणि उपस्थितीची मोठी चर्चा रंगली आहे.

'ओम गणेश' वर पाहुणचार आणि नितेश राणे यांचे स्वागत
चिपी विमानतळावर आगमन होताच आमदार नितेश राणे यांनी सर्व नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 'ओम गणेश' या निवासस्थानी सध्या उत्सवाचे वातावरण असून, राणे कुटुंबीयांकडून सर्व दिग्गज नेत्यांचा यथोचित पाहुणचार केला जात आहे. नडवे नाका येथील मुख्य कार्यक्रम स्थळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Web Title : नारायण राणे का जन्मदिन समारोह: कणकवली में राजनीतिक दिग्गजों का जमावड़ा।

Web Summary : नारायण राणे के जन्मदिन पर कणकवली में राजनीतिक जमावड़ा लगा। मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी और अन्य नेता एकता दिखाते हुए पहुंचे। नितेश राणे ने हवाई अड्डे पर और 'ओम गणेश' में उनका स्वागत किया, जिसके बाद नडवे नाका में एक भव्य कार्यक्रम हुआ, जिस पर पूरे जिले की निगाहें टिकी थीं।

Web Title : Narayan Rane's birthday celebration: Political giants gather in Kankavli.

Web Summary : Kankavli witnessed a political gathering for Narayan Rane's birthday. Chief Minister Fadnavis, Gadkari, and other leaders arrived, showcasing unity. Nitesh Rane welcomed them at the airport and at 'Om Ganesh', followed by a grand event at Nadave Naka, drawing district-wide attention.