शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा राज्यातील सरकार पाडायचे तेव्हा पाडणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 22:24 IST

Narayan Rane : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली.

सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही मोठे भाकीत केले आहे. भाजपा राज्यातील सरकार जेव्हा पाडायचे तेव्हा पाडणार. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची गरज नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. त्यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही मोठे भाकीत केले. भाजपा राज्यातील सरकार जेव्हा पाडायचे तेव्हा पाडणार. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची गरज नाही. सध्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. काल रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांच्या कृतीमधून हा असंतोष दिसला होता. एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, '' असे भाकीतही राणेंनी केले.  ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांसाठी कुठलाही निधी देण्याची घोषणा केलेली नाही. सी वर्ल्ड प्रकल्पाला एकेकाळी शिवसेनेने विरोध केला होता. मात्र आता त्या प्रकल्पाची बांधणी खासगी गुंतवणुकीतून करण्याची तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणाबाबत माहिती घेतली पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामाबाबत राज्य सरकाक कमी पडत आहे.  त्यांच्या आजच्या कोकण दौऱ्यातून कोकणाला काय मिळाले हा प्रश्नच आहे. सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असे नारायण राणे म्हणाले.  तसेच खासदार म्हणून मुख्यमंत्र्यांना मदत करण्यास कधीही तयार असल्याचेही राणेंनी सांगितले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण