शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

अतिआत्मविश्वासामुळे विधानसभेत पराभव: नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:09 PM

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच ...

मालवण : मालवण ही माझी राजकीय कर्मभूमी आहे. मालवणवासीयांच्या प्रेमाच्या जोरावर मी सहावेळा आमदारकीसह मुख्यमंत्री बनलो. याच विश्वासाच्या जोरावर मी २०१४ च्या निवडणुकीत उभा राहिलो. माझा पराभव करण्याची विरोधकांमध्ये क्षमता नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि माझा अतिआत्मविश्वास माझ्या पराभवाचे मुख्य कारण आहे. मतमोजणी सुरू असताना मालवण पिछाडीवर जात होते तेव्हाच पराभव निश्चित झाला होता. पराभव हा अपघात असला तरी खूप वेदना सहन कराव्या लागल्या, अशी कबुली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी मालवण येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिली.मालवण येथील स्वाभिमानच्या कार्यकर्ता मेळाव्यात आगामी निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांचे नेतृत्व जिल्ह्याला पुन्हा एकदा लाभावे, अशी हाक दिल्यानंतर राणेंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची जाहीर मीमांसा केली. यावेळच्या निवडणुकांमध्ये संधी दिल्यास निवडणुकांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत दिसेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.राणे म्हणाले, पराभव झाला असताना मी खचून न जाता दुसºया दिवसापासून कामाला लागलो. राज्यात कोणत्या मतदारसंघात जेवढी विकासात्मक कामे झाली नसतील तेवढी कामे माझ्या मतदारसंघात झाली. सी-वर्ल्ड प्रकल्प रायगड येथे करण्याचा घाट घातला असताना मी सिंधुदुर्गात खेचून आणला. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी दिल्ली दरबारी नेले. २०१४ मध्ये विमानतळ पूर्णत्वास येत असताना आता चार वर्षे उलटली तरी उड्डाण चाचणी झालेली नाही. पालकमंत्री केवळ बढाया मारत असल्याची टीकाही राणेंनी केली....म्हणून ‘नाणार’ला विरोधखासदारांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणला नाही. मात्र कोकण उद्ध्वस्त करणारा नाणार येथील रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादला जात आहे. नाणार परिसरात शेकडो बागायतदारांची लाखो आंबा, काजू कलमे आहेत. शिवाय कच्च्या पेट्रोलवर प्रक्रिया करून दूषित पाणी समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे वायुप्रदूषण होऊन मासेमारीसह कोकणच्या निसर्गाचा ºहास होईल. कोकणी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी नाणार प्रकल्प कोकणात येऊ देणारच नाही, अशी भूमिकाही राणेंनी स्पष्ट केली.पालकमंत्र्यांवर मोफत उपचार करून मिळेल !जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली असताना बदनामी करणाºया पालकमंत्र्यांना याच हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून दिले जातील. केवळ मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याच्या गप्पाच मारत सुटले असून त्यासाठी जागा, निधीची आवश्यकता लागते याचा पत्ताच नाही अशा शब्दांत राणेंनी त्यांची खिल्ली उडविली. विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असताना स्थानिक आमदार झोपले आहेत. समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी वजन लागते, नुसते वजन असून उपयोग नाही असा उपरोधिक टोला राणे यांनी हाणला.