शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मालवण नगराध्यक्षांचे नाव पत्रिकेतून डावलले

By admin | Updated: January 29, 2015 00:10 IST

आचरेकर, तोडणकरांची नाराजी

मालवण : गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेकवेळा सिंधु महोत्सव आयोजित करण्यात आले. हे महोत्सव यशस्वीही झाले. या प्रत्येक महोत्सवाच्यावेळी सर्वपक्षीयांना सामावून घेण्यात आले होते. मात्र, यावेळच्या मालवणात होणाऱ्या सिंधुमहोत्सवात सर्वपक्षीयांना सामावून घेण्यात आले नाही. एवढेच काय तर मालवणचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावही प्रसिद्ध करण्यात आले नाही. यात जिल्हा प्रशासनाचा दोष नसून यात काही राजकीय मंडळींचा कुटील डाव असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी करून सिंधुमहोत्सवाच्या नियोजनाविषयी नाराजी व्यक्त केली.मालवण येथे शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगराध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर म्हणाले, मालवणात शासनाच्यावतीने सिंधुमहोत्सव होत आहे. ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या सिंधुमहोत्सवामुळे मालवणच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. मात्र, मालवणात सिंधुमहोत्सव होत असताना या महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर प्रोटोकॉलनुसार नगराध्यक्षांचे नाव असणे गरजेचे होते. मात्र नगराध्यक्षांचे नाव वगळण्यात आले. यात जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही दोष नाही. मात्र नगराध्यक्षांचे नाव डावलण्यात काही राजकीय मंडळींचे कुटील कारस्थान कारणीभूत आहे. मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर म्हणाले, सिंधु महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मालवणचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांचे नाव असणे गरजेचे होते. आपला शासनावर रोष नाही. मात्र काही राजकीय व्यक्तींकडून नाव डावलले गेले, याची खंत आहे. फेबु्रवारी महिन्यात मालवणात पालिकेच्यावतीने महोत्सव होण्यासाठी नियोजन केली असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)