मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे : ही तर राजघराण्याची ईच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:05 PM2020-07-01T12:05:11+5:302020-07-01T12:06:20+5:30

सावंतवाडीतील रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी सावंतवाडीत मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच व्हावे, अशी खुद्द राजे खेमसावंत यांच्यासह राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळे याचठिकाणी रुग्णालय उभारण्याबाबत शासनाकडून विचार केला जावा, अशी प्रतिक्रिया सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी दिली. ​​​​​​​

Multispeciality hospital should be in Sawantwadi: This is the wish of the royal family | मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे : ही तर राजघराण्याची ईच्छा

मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे : ही तर राजघराण्याची ईच्छा

googlenewsNext
ठळक मुद्दे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच व्हावे ही तर राजघराण्याची ईच्छा :लखम सावंत

सावंतवाडी : सावंतवाडीतील रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी सावंतवाडीत मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच व्हावे, अशी खुद्द राजे खेमसावंत यांच्यासह राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळे याचठिकाणी रुग्णालय उभारण्याबाबत शासनाकडून विचार केला जावा, अशी प्रतिक्रिया सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी दिली.

यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव लवकरात लवकर राजघराण्याकडे द्या, असे खुद्द आमच्याकडून माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना सांगितले आहे. त्यांनीही ते मान्य केले आहे. परंतु काही लोक अन्यत्र रुग्णालय नेण्याच्या गोष्टी करीत आहेत, असेही ते म्हणाले.

सावंतवाडी शहरात उभारण्यात येणारे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अन्य ठिकाणी नेण्यासंदर्भात शिवसेनेतील काही मंडळींकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. या ठिकाणी असलेली जागा राजघराण्याकडून मिळण्यास अडचणी येत आहेत, असे सांगून यासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे.

त्यासंदर्भात लखम सावंत म्हणाले, माजी पालकमंत्री तथा आमदार केसरकर यांनी राजघराण्याशी चर्चा केली होती. त्यांना हा विषय माहीत आहे. आम्ही जागा देणार नाही अशी भूमिका कधीही घेतली नाही. परंतु काही लोक अन्य भूमिका मांडत आहेत. पर्यायी जागा शोधत आहेत, असे ते म्हणाले.
 

Web Title: Multispeciality hospital should be in Sawantwadi: This is the wish of the royal family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.