गुलदार युद्धनौका 'या'ठिकाणी स्थापित करण्याच्या हालचाली; वेंगुर्ला, मालवण येथील व्यावसायिकांमधून नाराजी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2025 18:52 IST2025-03-27T18:51:53+5:302025-03-27T18:52:57+5:30

संदीप बोडवे मालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू ...

Movements are underway to install the Guldar warship, which will be installed for tourism in the Nivati ​​Rock Sea in the Kunkeshwar Sea | गुलदार युद्धनौका 'या'ठिकाणी स्थापित करण्याच्या हालचाली; वेंगुर्ला, मालवण येथील व्यावसायिकांमधून नाराजी

गुलदार युद्धनौका 'या'ठिकाणी स्थापित करण्याच्या हालचाली; वेंगुर्ला, मालवण येथील व्यावसायिकांमधून नाराजी

संदीप बोडवे

मालवण : निवती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वराच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे. दरम्यान, गेली सात वर्ष वाट पाहत असलेल्या वेंगुर्ला आणि मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया येथील पर्यटन व्यावसायिकांमधून उमटू लागल्या आहेत.

मालवण आणि वेंगुर्ला परिसरात भोगवे, निवती, देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनवाढीस वाव आहे. या भागातील पर्यटनाला जागतिक दर्जा मिळावा यासाठी येथे एखादा नावीन्य पूर्ण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील पर्यटन व्यावसायिकांची मागील १०-१२ वर्षांपासूनची मागणी होती. याच मागणीचा विचार करता निवती रॉक समुद्रात नौदलाची निवृत्त युद्धनौका स्थापित करून तिथे पाणबुडी प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मागील सहा-सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतर अखेर नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आणि पाणबुडी प्रकल्पाला केंद्राने निधीची तरतूद करत हिरवा कंदील दाखविला होता.

किनाऱ्यापासून तीन किलोमीटरवर

कुणकेश्वर समुद्रात किनाऱ्यापासून तीन किलोमीटर लांब २० मीटर खोल समुद्रात गुलदार युद्धनौका स्थापित करण्याचे ठरले आहे. यासंदर्भातील एक पत्र महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पाठविण्यात आले आहे. या पत्रात गुलदार स्थापित करण्याच्या जागेत अंशतः बदल करण्यात आला असून, निवती रॉकऐवजी कुणकेश्वर येथील समुद्रातील जागेची निवड करण्यात आली आहे. असे म्हटले आहे.

जागा बदलण्याने नाराजीचा सूर

निवती रॉक समुद्रात राबविण्यात येणारा आणि मागील अनेक वर्षांची मागणी असलेला अंडरवॉटर म्युझियम ॲण्ड आर्टिफिशल रीफ आणि पाणबुडीचा प्रकल्प तडकाफडकी कुणकेश्वरला होणार असल्याची माहिती मिळताच मालवण आणि वेंगुर्ला येथील पर्यटन व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नव्या जागेच्या शोधात..

निवती रॉक येथील समुद्राच्या पाण्याखालील प्रकल्प कुणकेश्वर येथे हलविण्याच्या संदर्भाने पर्यटन विभागाचे सचिव अतुल पाटणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या मदतीने नव्या जागेच्या शोधात आहोत, अशी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.

Web Title: Movements are underway to install the Guldar warship, which will be installed for tourism in the Nivati ​​Rock Sea in the Kunkeshwar Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.