चौके आरोग्यकेंद्रात लेक वाचवा अंतर्गत नवजात बालिकेसह मातेचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 17:21 IST2017-12-01T17:16:26+5:302017-12-01T17:21:51+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र चौके, रूग्णकल्याण समितीतर्फे लेक वाचवा अभियानांतर्गत चौके आरोग्यकेंद्रात जन्म झालेल्या नवजात बालिकेचे स्वागत करण्यात आले. यावेळी नवजात बालिकेला पैंजण आणि तिची माता प्रेरणा प्रतिक कदम यांना साडी देऊन सत्कार करण्यात आला.

लेक वाचवा अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र चौके रूग्णकल्याण समितीतर्फे नवजात बालिकेचे स्वागत आणि मातापित्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, के. एम. शिर्सेकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. (छाया- अमोल गोसावी)
ठळक मुद्देचौके आरोग्यकेंद्रात जन्म झालेल्या नवजात बालिकेचे स्वागत नवजात बालिकेला पैंजण आणि मातेचा साडी देऊन सत्कार
चौके : प्राथमिक आरोग्य केंद्र चौके, रूग्णकल्याण समितीतर्फे लेक वाचवा अभियानांतर्गत चौके आरोग्यकेंद्रात जन्म झालेल्या नवजात बालिकेचे स्वागत करण्यात आले. यावेळी नवजात बालिकेला पैंजण आणि तिची माता प्रेरणा प्रतिक कदम यांना साडी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवजात मुलीचे वडील प्रतिक कदम व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्यासमवेत डॉ. श्री. डी. कदम, आरोग्य सहाय्यक यु. टी. राणे, के. एस. शिर्सेकर, औषध निर्माण अधिकारी यु. यु. गोवेकर, आरोग्य सहाय्यिका एस. सी. वसावे, आरोग्य सेविका जी. जी. कसालकर, एन. डी. चव्हाण आदीजण उपस्थित होते.