शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका सिंधुदुर्गात; आॅनलाईन अर्ज भरण्याची पद्धत चांगली - जे. एस. सहारिया  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 22:11 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

कुडाळ : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. ते कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात ४६ सरपंच व ९२६ ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे असे सांगत अर्ज भरण्यासाठी आॅनलाईनची पद्धत चांगली असल्याचे मत व्यक्त केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ४२५ पैकी ३२५ ग्रामपंचायतींच्या होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया व सचिव शेखर चन्ने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. सोमवारी सायंकाळी एमआयडीसीच्या विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्य निवडणूक सचिव चन्ने, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते.सहारिया म्हणाले, राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहेत. ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून दोन्हीही पदांसाठी एकूण ६ हजार ५०० उमेदवारी अर्ज आले होते. अर्ज छाननीनंतर सरपंचपदासाठी ८३७ व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३ हजार ६६१ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत व चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे नियोजन व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पोलीस यंत्रणेमार्फत ४५ विभाग करण्यात आले असून २० ठिकाणी नाका तपासणी पथके सीसीटीव्ही यंत्रणेसहीत कार्यान्वित असणार आहेत. भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास भरारी पथके वाढविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात येणारे रस्ते, रेल्वे, समुद्र्री व हवाई मार्ग या ठिकाणीही चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.निवडणुका जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत १०१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये विविध ठिकाणी पकडलेल्या सुमारे ४६ लाख रुपयांच्या अवैध दारूच्या तसेच विनापरवाना शस्त्रास्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. ४६ सरपंच, ९२६ सदस्य बिनविरोध : सहारियानिवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सरपंचांपैकी ४६ सरपंच बिनविरोध झाल्याने २७९ सरपंचपदासाठी, तर ९२६ सदस्य बिनविरोध झाल्यामुळे १ हजार ७३५ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले. जिल्ह्यात ४ लाख २ हजार मतदार असून १ हजार २९ मतदान केंद्र्रांसाठी ६१९ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त मतदान केंद्रे कणकवली तालुक्यात असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक