शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

आनंदवार्ता! सिंधुदुर्गात मान्सून दाखल; मालवण, वेंगुर्ल्यात मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 21:49 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.५५ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २८८.४ मिमी पाऊस झाला आहे.

कणकवली: हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्गात गेले दोन दिवस मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळपासूनच किनारपट्टीवरील मालवणात व वेंगुर्ल्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.५५ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २८८.४ मिमी पाऊस झाला आहे.केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात दाखल होतो. महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मग मान्सूनची वाटचाल पुढे मुंबई व इतर भागात होते. येत्या दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार गुरुवार सकाळपासूनच सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यासारखी स्थिती होती. मागील २४ तासात जिल्ह्यात तालुकानिहाय पावसाची आकडेवारीमध्ये दोडामार्ग २८ (२८0), सावंतवाडी निरंक (२८३), वेंगुर्ला ६.४(३३९.२), कुडाळ २५ (२२७),  मालवण १४ (३५२), कणकवली  १५ (१९0), देवगड २६ (३३३), वैभववाडी १0 (३0३) असा पाऊस झाला आहे.शेतकरी, बागायतदार सुखावलासकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने मान्सूनची वाट पाहणारा शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी अधूनमधून दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठांमधील गर्दीदेखील ओसरली. शेतक-यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. तर काजू व कलम बागायदारांनी बागयतीमध्ये मशागतीच्या कामाला तसेच झाडांना खत घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा

Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'

...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार 

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

टॅग्स :Rainपाऊस