शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मोबाईल चोर कोल्हापुरातून ताब्यात, मालवण पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:01 IST

Crimenews Sindhudurg : तारकर्ली एमटीडीसी येथून पर्यटकांचा मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला मंगळवार, ६ जुलै रोजी मालवण पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

ठळक मुद्देमोबाईल चोर कोल्हापुरातून ताब्यात मालवण पोलिसांनी केली अटक

मालवण : तारकर्ली एमटीडीसी येथून पर्यटकांचा मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला मंगळवार, ६ जुलै रोजी मालवण पोलिसांनीकोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.तारकर्ली एमटीडीसी येथे २ मार्च रोजी पर्यटन सफरीवर आलेल्या नाशिक येथील पर्यटक शेखशोएब शेख सलीम यांचा सॅमसंग कंपनीचा १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल ३ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चोरीस गेला होता.

समुद्र किनारी असलेल्या गजीबो येथून मोबाईल चोरीस गेला होता. याप्रकरणी शेख शोएब यांनी मालवण पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष शिवगण तपास करत होते.चोरीस गेलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात आले. मोबाईल लोकेशन कोल्हापूर येथे दिसून आले. प्राप्त लोकेशननुसार शिवा शिवगण व धोंडू जानकर यांचे पथक सोमवार, ५ जुलै रोजी कोल्हापूर येथे दाखल झाले. मोबाईल चोरीप्रकरणी संशयित पवन नामदेव कुसाळे (२९, रा. शांतीउद्यान आपटेनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. मंगळवार, ६ जुलै रोजी संशयित पवन याला मालवण पोलीस ठाणे येथे आणून चौकशीअंती अटक करण्यात आली. चोरीस गेलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस