शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

By सुधीर राणे | Published: October 21, 2022 4:25 PM

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

कणकवली : वाढत्या महागाईला आणि खूप वाईट मार्गाने चाललेल्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी कुडाळ येथे मोर्चा काढला. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने १०० रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची केलेली घोषणा अजून पूर्ण झालेली नाही. नेत्यांची छायाचित्रे असलेले बॉक्स की पिशव्या छापाव्यात हे ठरत नसल्यानेच हा घोळ झाला, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जनतेला कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अवैध धंदे वाढत चालले आहेत. घोटाळे करून जनतेचा पैसा राजकारणी आणि अधिकारी आपल्या घरात नेत आहेत. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय यंत्रणेवर वचक राहिलेला नाही. आर्थिक घोटाळे करून अधिकारी श्रीमंत होत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा जिल्ह्यात आले. मात्र, गणेशोत्सवाला दिलेले आश्वासन दिवाळी आली तरी पूर्ण झालेले नसून रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे. तरीही तिला न्याय मिळत नाही.आमदाराला चौकशीपासून मुक्त करा, अशी मागणी करीत मोर्चा काढण्यापेक्षा जनतेचा थोडा तरी विचार करावा. सर्वच पक्षांनी जनतेची निराशा केलेली आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे राज्यात आज समंजसपणाचे राजकारण करत आहेत. त्या समांजसपणाला काहीजण स्क्रिप्ट म्हणतात. मात्र, राज ठाकरे हे काम अगदी प्रामाणिकपणे आणि समंजसपणे करत आहेत. त्यांच्यासारखी भूमिका सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर